या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २ ०२ १२:४९, २९ मार्च २०१८ (IST)~ ~ धान अशा वातावरणांत सभा संपली पाहिजे व हे अध्यक्षावर विशेष अवलंबून आहे. त्याचा अखेरचा संदेश, त्याचे अखेरचे भाषण में सभासदांच्या मनावर अखेरचा परिणाम करणारे असते. हे अखेरचे भाषण आटोपशीर, चटकदार व सारभूत असले पाहिजे. सभेतील जखमा, आघात-प्रत्याघात, मानापमान वगैरेंनी आलेला कडवटपणा अध्यक्षाचे अखेरचे भाषणाने नाहीसा होऊन सभेला कृतकार्यतेची प्रसन्नता वाटली पाहिजे. या अखेरच्या ‘भैरवी मजलस खूष होऊन समाप्त झाली पाहिजे. उत्कृष्ट स्वाराचे नियंत्रण घोड्यालासुद्धा आवडते. सभासंचालन हे सहकार्य व नियंत्रण दोन्ही आहे. अध्यक्षाने ही पार्श्वभूमि लक्षात घेऊन, त्याप्रमाणे वागून, सभासदांचे धन्यवाद मिळविले पाहिजेत. मिळालेल्या सहकार्याबद्दल त्याने सभासदांस धन्यवाद पण दिले पाहिजेत. जेथे अध्यक्ष केवळ चर्चेचा नियंत्रक आहे तेथे तो चर्चेचा अगर सभेचाही समारोप करीत नाही. आपली तटस्थ भूमिका तो काटेकोर रीतीने कायम ठेवत असतो. कार्यक्रम संपताच सभाकार्य संपते, व जेथे अध्यक्ष समारोप करतो तेथे त्या समारोपानंतर सभा संपते. तथापि, अध्यक्ष ‘समा समाप्त झाली असे म्हणेपर्यंत ती समाप्त होत नाही व त्याचा अधिकारही समाप्त होत नाहीं. आभारादि कार्ये असतात त्याही वेळी नियंत्रणाची जरुरी असते. या बाबतींतील मर्यादांचे विवेचन पूर्वी केले आहे. आभारप्रदर्शनानंतर, जेथे प्रस्तुत असेल तेथे राष्ट्रगीतगायनानंतर अध्यक्षानें “सभा समाप्त झाली' असे जाहीर करावे. हे जाहीर केल्यानंतरच सभा समाप्त होते. तोपर्यंत अध्यक्षाला सभास्थानांतील परिस्थितीवर सर्व तव्हेने नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आहे. सभासमाप्ति जाहीर झाल्यानंतर सभास्थानावरील नियंत्रण सभाचालकांचे असते. संघटित संस्थांच्या सभेचे स्वरूपः-घटनेनुसार संघटित झालेल्या संस्थांच्या सभा व सार्वजनिक सभा यांतील मोठा भेद म्हणजे, एकति भाग घेण्याचा अधिकार नियमाप्रमाणे सभासदत्व मिळविले असेल व कायम असेल त्यांना आहे. दुसरीत ते केवळ सभेत हजर राहाण्याने मिळते. म्हणून संघटितं संस्थांच्या सभा या सार्वजानिक सभा नव्हेत, त्यांना सार्वजनिक सभा बोलाविता येतात हे खरे, पण जेव्हा त्यांच्या सभासदांच्या सभा होतात तेव्हां जे सभासद नाहीत त्यांना सभेत भाग घेण्याचा अधिकार नाही. संस्थेची साधारणसभा असो, अगर असाधारणसभा असो अगर प्रार्थित सभा असो फक्त