या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२५ संघतंत्र • • दर्शविणारे, पण सभासद प्रादेशिकदृष्ट्या संकुचित दृष्टीचे; संघ जनसेवा करणारा, पण सभासद स्वार्थ साधणारे; हे विरोध शल्यवत् वाटतात. संघ घटनेत कसाही असो, नांवानें तो कांहीही असो, त्याचे वास्तविक स्वरूप, त्याच्या विद्यमान् सभासदांचे विचारांवरून व वर्तनांवरून ठरते. संघाचा प्रभावी घटक म्हणजे सभासद होय; म्हणून सभासदत्व ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. सभासदत्व हे गौरवाचे भूषण व्हावयाचे असेल, प्रभावी व कार्यक्षम व्हावयाचे असेल, तर ते पात्रतेचा विचार करूनच मिळाले पाहिजे. संस्थेचे स्वरूप व कार्य यांवर सभासदत्व कसे प्राप्त होईल हे अवलंबून आहे. भाग विकत घेतला, प्रवेश-फी दिली, उद्देशपत्रिका मान्य केली की सभासदत्व प्राप्त झाले असेंही असू शकते. उलट विविक्षित काल उमेदवारी केली, कांहीं कार्य करून दाखविलें, कांहीं रचना केली, तरच सभासदत्व मिळेल असेही असू शकेल, संस्था व सभासद हे समान हेतु असले पाहिजेत. संस्थेच्या हेतुला मान्यता ही किमान लायकी आहे. संस्था म्हणजे वाटेल त्याने यावे व वाटेल तेव्हां जावे असे बाजारी स्वरूप तिचे नसावें. केवळ करमणुकीसाठी असलेल्या नाट्यगृहांत प्रवेश जरी तिकिट विकत घेतल्याने मिळत असला तरी, अयोग्य वर्तन करणारास बाहेर घालविले जाते. मग जेथे प्रवेश, हेतूंना मान्यता देऊन मिळतो, व जेथे संघ केवळ करमणुकीसाठी नाही तेथे, अयोग्य वर्तन करणाच्या सभासदाला संघाबाहेर घालविण्याची व्यवस्था असणे जरूर आहे. संघांत येतांना हेतूंना मान्यता असली पाहिजे, संघांत असेपर्यंत संघनियमांना अनुसरून वर्तन असले पाहिजे. संघाबाहेर जातांना आपली जबाबदारी पुरी करून सभासदाने गेले पाहिजे. या दृष्टीने विचार करतां सभासद-प्रवेश, सभासदांचे वर्तन, शिस्तभंगाची, सभासदत्व रद्द अगर तहकूब करण्याची व्यवस्था, घटनेत असली पाहिजे. संघांत येण्याचा उद्देश, व्यक्तीचा विकास व्हावा, तिची उन्नति व्हावी, तिला आनंद प्राप्त व्हावा, असा असल्याने संघाच्या नियमांनी व्यक्तींचा विकास मारला जावा, अगर उन्नात स्थगित व्हावी, अगर शिस्तीखाली आनंद करपून जावा, असे होऊ नये. त्याचबरोबर संघ म्हणजे सहकार्य, कांहीं देऊन कांहीं घ्यावयाचे असते, कांहीं बंधन स्वीकारून कांहीं स्वातंत्र्य तेजस्वी करावयाचे, हेही सभासदाने विसरून चालणार नाहीं. एकलकोंड्या व्यक्तिनिष्ठ, भांडकुदळ, अतितार्किक, हेकेखोर प्रवृत्तीचा सभासद स... १५