या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २४२ •••••• ••••••• (५१ ) जर अध्यक्षाला सूचनेतील बाब नियमानुसार आहे असे वाटले तर सदरहू सूचना मांडण्यास सभागृहाची परवानगी आहे का असे तो विचारील, कोणी हरकत घेतल्यास परवानगी द्यावी असे म्हणणाच्या सभासदांना आपआपल्या जागी उभे राहाण्यास अध्यक्ष सांगेल, व जर २५ पेक्षा अधिक सभासद उभे राहिले असतील, तर परवानगी दिली आहे, व सदरहू सूचना दुरारी चार वाजता घेतली जाईल, असे जाहीर करील. जर संबंध असलेल्या सरकारच्या सभासदाची सम्मति असेल तर त्या दिवसाचे काम संपतांच चारचे आधीही ती घेतली जाईल, असे अध्यक्ष ठरवील. २५ पेक्षा कमी सभासद उभे राहिले तर परवानगी मागणाच्या सभासदाला परवानगी नाहीं असे अध्यक्ष सांगेल. (५२ ) निश्चित व निकडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींचा विचार करण्यासाठी आणलेल्या तहकुबीच्या सूचनेच्या वेळी मतासाठीं अध्यक्षाने फक्त ‘आतां ही सभा तहकूब व्हावी हा प्रश्न घालावा. जर सहा वाजेपर्यंत सूचनेवरील चर्चा संपली नाही तर चर्चा आपोआप संपते व प्रश्न मताला घातला जाणार नाहीं. (५३) नोटिशीनंतर व अध्यक्षानें सम्मति देण्यापूर्वी अगर दिली तरी, या सूचनेची दखल गव्हर्नर जनरल घेईल व सार्वजनिक हिताविरुद्ध ती आहे अगर गव्हर्नर-जनरल इन् कौन्सिलचे अधिकारक्षेत्राबाहेरील विषयासंबंधांत आहे, असे वाटल्यास तिला बंदी करील व तशी बंदी केल्यास तहकूबीची सूचना मांडली जाणार नाहीं अगर त्यावर अधिक चर्चा होणार नाहीं. कामकाजाचे पद्धतीबद्दल साधारण नियम । (५४) किमान २५ सभासद हजर असतील तरच सभेचे काम चालेल. | (५५) सभा चालू असतां सभासदानें हजर सभासद मोजावे अशी मागणी केल्यास व २५ पेक्षा कमी सभासद हजर आहेत असे आढळून आल्यास अध्यक्ष ज्या दुस-या दिवशी सभा भरणार असेल त्या दिवसापर्यंत सभा तहकूब करील. एकदां सभासदांची मोजणी केल्यानंतर एक तास जाईपर्यंत पुनः मोजणीची मागणी आणता येणार नाहीं. | (५६) अध्यक्ष ठखील त्या क्रमाने सभासदांनी बसले पाहिजे. (५७) सभेपुढील कामासंबंधी कोणाही सभासदाला काहीही बोलावयाचे