या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २५८ व त्याप्रमाणे त्याने जारी केल्यास वरीलप्रमाणेच तो प्रभावी व परिणामी होईल. मात्र बादशहाने नामंजूर केल्यास तो रद्द होईल. | (१२४) १. जेव्हा एखादे मंडळांत सरकारी बिलाबाबत (अ) कालहारिणी सूचना पास झाली असेल अगर ( ब ) जेव्हा एखादें मंडळ सरकारी बिल विचारांत घेण्याचे नाकारील अगर निवडक कमिटीकडे सोपविण्याचे नाकारील अगर पास करण्याचे. नाकारील व त्यानंतर जेव्हां गव्हर्नर-जनरल शिफारस केलेले बिल धाडील व ते मांडण्याची परवानगी-सूचना ज्या वेळी करण्यांत येईल त्या वेळी ( अ ) यांत सांगितलेली कालहारिणी सूचना परत घेतली गेली असे समजले जाईल. २. वर (१) यांत वर्णन केल्याप्रमाणे ज्या वेळी शिफारस केलेले बिल मांडलें जाईल, त्या वेळी त्या मंडळाने त्या अधिवेशनांत जरी कांहीं निर्णय घेतला असला तरी तोच विषय त्या बिलाबाबत सूचनेने पुनः आणतां येईल. | ३. या नियमाचे संदर्भात कालहारिणी सूचना म्हणजे बिल निवडक कमिटीकडे धाडावें अगर लोकमत अंदाजासाठी फिरते करावें अगर अन्य कोणतीही सूचना की, जिचा परिणाम बिल पास होण्याचे काम विलंब होईल, अशी सूचना होय. (१२५) १. बिलाबाबत गव्हर्नर-जनरल हिंदी राज्यकारभाराबाबतचे कलम ६७ ब पशिष्ट ९ प्रमाणे जी शिफारस करील ती संदेश धाडून करील व मंडळाचा अध्यक्ष त्याची दखल मंडळाला देईल व शिफारशीचा शेरा बिलावर देण्यात येईल, २. शिफारस केलेल्या बिलाबाबत ते बिल मांडणाच्या सरकारी सभासदाचे सम्मतीशिवाय कोणतीही कालहारिणी सूचना मांडता येणार नाही व अशी आली असेल पण पाप्त झाली नसेल तर ती सभेपुढे ठेवली जाणार नाही. ३. जेव्हां एखादं बिल कोठल्याही मंडळापुढे चर्चेसाठी असतांना गव्हर्नरजनरलने त्याबाबत कांहीं शिफारस केली व पूर्वीच पास झालेले एखादे कलम अगर एखादी सूचना गव्हर्नर-जनरलच्या शिफारसीस विसंगत असेल तर बिल आणणाच्या सरकारी सभासदाला गव्हर्नर-जनरलचे शिफारसीबरहुकूम बिल करण्याचे दृष्टीने वाटेल ती दुरुस्ती अगर उपसूचना आणतां येईल. ४. ब्रिटिश हिंदुस्थानचे हित, शांतता व संरक्षण यांसाठी विशिष्ट स्वरुपांत