या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८७ पुणे शहर म्युनिासपालिटीने केलेले नियम (७) चीफ ऑफिसर व कंट्रोलिंग कमिट्यांनी दिलेल्या हुकुमांविरुद्ध अपील, (८) सरकार अगर सरकारी अधिकारी यांचेकडून आलेली पत्रे अगर समोरॅन्डा. (९) ठरावांच्या नोटिसा. (१०) किरकोळ. (११) वाचण्याकरिता अगर माहितीकरितां टेबलावर ठेवलेले कागदपत्र, ६. कामास सुरुवात करण्याची वेळ-ज्या वेळी कोरमची जरुरी नसेल त्या वेळी सभेच्या कामास ठरल्या वेळी सुरुवात करण्यांत यावी. कोरमची जरुरी असेल त्या वेळी ठरल्या वेळेवर अगर त्यानंतर कोरम भरतांच कामास सुरुवात करावी, तथापि कायद्याचे कलम ३५ (७) यांत केलेल्या तरतुदीशीं पात्र राहिले पाहिजे. ७. वृत्तांत कायम करणे :–अध्यक्षांनी आपले स्थान स्वीकारल्यानंतर मागील सभेचा वृत्तांत वाचण्यांत येईल, आणि कायम केल्यानंतर त्यावर अध्यक्षांची सही होईल, मात्र सदरील वृत्तांत म्युनिसिपल बरोत हजर असलेल्या सभासदांना अगोदरच वांटण्यांत आलेला असून, त्याला कोणतीही हरकत घेण्यांत आलेली नसल्यास तो (वृत्तांत ) वाचला म्हणून समजण्यांत यावें, ८. वृत्तांतांत दुरुस्ती करणे :–जर हजर असलेल्या सभासदांपैकी एखाद्या सभासदानें वृत्तांत चुकीचा अगर अपुरा घेतला आहे अशी हरकत घेतली तर अध्यक्षांनीं सभेचा अभिप्राय घेऊन त्यांस योग्य वाटतील त्याप्रमाणे सदरील वृत्तांतांत दुरुस्त्या कराव्या आणि नंतर हा दुरुस्त केलेला वृत्तांत कायम करण्यांत यावा व त्यावर अध्यक्षांनी सही करावी. ९. वापरावयाची भाषा--सभेचे कामकाज इंग्रजीत किंवा मराठीत किंवा हिंदुस्थानींत चालविण्यांत यावे आणि यांपैकी कोणत्याही भाषेत आपले विचार स्वतःस मांडतां येणे अशक्य आहे अशा सभासदाच्या विनंतीवरून व वतीने दुसच्या सभासदाने बोलल्यास चालेल, १०. बोलण्याची पद्धत ः–कोणतीही सूचना, उपसूचना, अगर प्रश्न पुढे मांडतांना व त्यावर वादविवाद करतांना सभासदांनी आपल्या जागेवरून बोलावे, बोलतांना उठून उभे राहावें व अध्यक्षस्थानी असणा-या व्यक्तीस