या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २९८ ००० करण्यांत येईल; व सदर विषय निकालात काढण्यापूर्वी एखाद्याकडून, मुदतींत, सदर विषयासंबंधी लेखी हरकत अगर सूचना आल्यास त्यांचा विचार केला जाईल, आलेल्या सूचनास अनुसरून प्रोग्राम अगर विषय दुरुस्त करून अगर आहे तसाच शेवटीं मंजूर केल्यास, पुन्हा वर नमूद केल्याप्रमाणेच कार्यपद्धति अनुसरल्याशिवाय त्या ठरावांत बदल, दुरुस्ती अगर तो रद्द करतां येणार नाहीं. | ४५. वृत्तांत ठेवण्याचा नमुना :–वृत्तांत मराठींत किंवा इंग्रजीत (जरूर असेल त्याप्रमाणें ) सोबतच्या परिशिष्ट 'अ' मध्ये सांगितलेल्या नमुन्याबरहुकूम अगर म्युनिसिपालिटीने स्टैंडिंग ऑर्डर काढून ठरविलेल्या इतर वृत्तांताच्या नमुन्याप्रमाणे लिहिण्यांत येईल, ४६. एखादा विषय, जनरल कमिटीच्या अजेंड्यावर (कार्यपात्रिका) प्रासद्ध होऊन सतत सहा महिने विचार न होतां पडून राहिल्यास, संबंधी सभासद अगर खात्याकडून तो पुनः अजेंड्यावर ( कार्यपत्रिकेवर ) घेणेबाबत नवीन लेखी नोटीस आल्याशिवाय अजेंड्यावर (कार्यपात्रिकेवर) घेतला जाणार नाही.