या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*

८१ सभानियमन व संचालन ००० धाडली पाहिजे. तिच्यांतही सामान्य माणसाला समजेल अशा रीतीने बाबींचा उल्लेख असला पाहिजे. सभेपुढे येणा-या विषयासंबंध यथार्थ कल्पना सभासदांना देणे हैं संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे एक महत्त्वाचे कर्तव्य आहे. विषय पाहून येणे किंवा न येणे हे सभासद ठरवीत असतो, तसेंच विषयाची आगाऊ कल्पना असली म्हणजे काही विचार करूनही तो येतो, व त्यामुळे विचारविनिमयास मदत होते. ' । हजर राहण्याचा हक्क असणारांस हजर राहतां येईल, निदान बहुसंख्याकांना हजर राहता येईल अशी सभेची वेळ व जागा असावी. सभास्थानी सभासदांना प्रवेश मिळेल अशी व्यवस्था व येवढी जागा ती असावी. हक्कदार सभासदांना प्रवेश मिळाला नाहीं अगर बसण्यास जागा मिळाली नाहीं तर, ती सभा विधियुक्त होणार नाही. म्हणून सभेचा विषय, परिस्थिति व सभासदांची संख्या लक्षात घेऊन योग्य तें सभास्थान मुक्रर करणे अवश्य आहे. बहुसंख्याक सभासदांच्या दृष्टीने वेळ व स्थळ हीं गैरसोयीचीं, हजर राहणे अशक्य करणारी असतील तर हजर असलेल्या सर्व सभासदांनी एकमताने जरी कांहीं केले तरी, तें सभाकार्य विधियुक्त नाहीं. । नोटिशीचे अभावीं कांहीं सभासद गैरहजर आहेत व बाकी हजर असणात्यांनी जरी एकमताने काही ठरवले तरी, ते कायदेशीर नाही. मात्र एखादा अगर कांहीं सभासद नोटीस दिली तरी हजर राहणे अशक्य आहेत म्हणजे दूरदेशी आहेत व ही गोष्ट विख्यात अगर ज्ञात आहे, अशा परिस्थितीत या सभासदांना नोटीस दिली नाही म्हणून सभाकार्य गैरशिस्त अगर कायद्याविरुद्ध होत नाही. सामान्यतः नोटिशीअभावी सभाकार्य विधियुक्त नाहीं. नियमाप्रमाणे नोटीस सर्व सभासदांना असावी. सर्व सभासद हज़र, नोटिशीबद्दल तक्रार नाही, या परिस्थितीत कांहीं कार्य झाले तर ते विधियुक्त ठरते; कारण कोणावर अन्याय होत नाहीं. अध्यक्ष सामान्यतः संस्थेचे अधिकारीमंडळ नियमाप्रमाणे ठराविक मुदतीसाठी निवडलेलें अगर नेमलेले असते. अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचे अधिकारही नियमांत सांगितलेले असतात. संस्थेच्या सभेचे अध्यक्षस्थान नियमाप्रमाणे अध्यक्ष घेतो. त्याच्या गैरहजेरीत उपाध्यक्ष, उपाध्यक्षाचे गैरहजेरीत हजर सभासदांनीं तो निवडावयाचा असतो. जेथे नियमाप्रमाणे सभेचे अध्यक्षस्थान स...६