या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ ।

  • कायदा काय सांगतो.••

वधु पक्षाकडून वर पक्षाला लग्नापूर्वी अगर लग्नानंतर थेट किंवा अप्रत्यक्ष चीजवस्तू, स्थावर, जंगम मालमत्ता देणे अगर देण्याचे कबूल करणे म्हणजेच हुंडा. हुंडा देणे आणि हुंडा घेणे दोन्ही गुन्हाच आहे. लग्नानंतर १० वर्षापर्यंत विवाहितेला पैसे, चीज वस्तू, सोने यासाठी शारिरीक किंवा मानसिक त्रास देणे हा गुन्हा आहे. जर एखाद्या विवाहित स्त्रीचा मृत्यू विवाहानंतर सात वर्षांच्या आत अनैसर्गिक, संशयास्पद परिस्थितीत झाला आणि असे सिद्ध झाले की, मृत्यूपूर्वी तिचा नवरा अथवा त्याचे नातेवाईक यांनी तिचा शारीरिक किंवा मानसिक छळ केला होता, तर त्या स्त्रीचा मृत्यू हा हुंडाबळी असल्याचे मानले जाईल. तिच्या मृत्यूसाठी तिचा नवरा किंवा त्याचे नातेवाईक यांना जबाबदार धरले जाईल. | या कलमाखाली पीडित स्त्रीचे नातेवाईक हे, तिचा नवरा आणि सासरचे नातेवाईक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करू शकतात. गुन्हा सिद्ध झाल्यास या कायद्याखाली सात वर्षे कैद किंवा अधिकाधिक जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

  • शिक्षेची तरतूद•••

हुंडा घेणा-यास ५ वर्षे सक्त मजूरी आणि रु.१५०००/- पर्यंत दंडाची शिक्षा आहे. एखाद्या व्यक्तीने जर आत्महत्या केली, तर लेक लाडकी अभियान शिरुर (का) | (१५)