या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा १९९४ सुधारीत २००३

  • प्रस्तावना :

आपल्या देशात जन्माच्या आधीपासूनच कायद्याची सुरुवात होते. सोनोग्राफी किंवा जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर करून गर्भातच ती मुलगी आहे का । मुलगा हे तपासले जाते आणि मुलगी असेल तर त्या मुलीच्या आईला गर्भपाताचा सल्ला दिला जातो. जन्मण्याआधीच मुलींना जीवन नाकारण्याच्या व्यवस्थेविरुध्द कायदा करावा लागला. दर वर्षी भारतात ६ लाख मुली या पद्धतीने गायब केल्या । जातात. म्हणून सोनोग्राफी किंवा जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर करून मुलगा किंवा मुलगी तपासणे आणि मुलगी असल्यास बेकायदेशीर गर्भपात करणे या दोन्हीही गोष्टी बेकायदेशीर ठरविण्यात आल्या. म्हणून आपण आपल्या आई-वडिलांचे आभार मानले पाहिजे. तंत्रज्ञान उपलब्ध असताना बेकायदेशीररित्या त्यांनी त्याचा वापर करुन नाहीसे केले नाही तर मुलगी म्हणून जन्माला येवू दिले. आता आपले कर्तव्य असणार आहे की, जेव्हा आपणास बाळ होईल तेव्हा निसर्गाचे जे दान आपल्या पदरात पडले असेल त्याचे स्वागत आनंदाने केले पाहिजे. कोणत्याही दबावाला बळी न पडता तंत्रज्ञानाचा उपयोग करून गर्भलिंग निदान करू नये. * कायदा काय सांगतो. हा कायदा मुलीला वाचविण्यासाठी आईला मदत करतो. आईने गर्भलिंग निदान करायचे नाही असे ठरविले तर ती, तिचा पती, नातेवाईक, तंत्रज्ञान या सर्वांच्या विरोधात उभे राहून आपल्या मुलीला मुलगी म्हणून लेक लाडकी अभियान शिरुर (का) (१) ।