या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गर्भातच तिचा शोध घेवून तिला नाहीशी करणा-यांविरुद्ध लढू शकते. कायदा मुलीच्या संरक्षणासाठी आईसोबत भक्कमपणे उभे रहातो म्हणून सदर कायद्याची माहिती प्रत्येक गरोदर महिलेस असल्यास आणि महिलांनी निर्भयपणे कायद्याचा वापर करायचे ठरविल्यास एकाही मुलीचे गर्भलिंग निदान होणार नाही आणि मुलींची संख्या कमी होणार नाही. आपण मुलगी म्हणून जन्माला आलो आहे म्हणून भविष्यकाळातील मुली वाचविणे आपल्याच हातात आहे. सदर कायद्याचे नाव आहे 'गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा-सुधारित २००३.

  • शिक्षेची तरतूद •••

गरोदर मातेचा गर्भ मुलगा किंवा मुलगी हे गर्भलिंग निदान करुन मागणाच्या पालकांना, नातेवाईकांना ५ वर्षे सक्त मजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा आहे. करणा-या डॉक्टर्सना ३ वर्षे सक्तमजुरी आणि रु. १००००/- दंडाची शिक्षा आहे. अशी शिक्षा लागलेल्या डॉक्टरांची सेवा ५ वर्षासाठी रद्द केली जाते. गर्भवती महिलेवर गुन्हा दाखल होत नाही.

  • तक्रार कोणाकडे कराल ?

सदर कायद्या संदर्भातील तक्रार महाराष्ट्र शासनाच्या Toll Free 182334475 नंबर वर करू शकतो. www.amchimulgi.com या वेबसाईटवर ही तक्रार दाखल करू शकतो. आपल्या जिल्ह्यात या संदर्भातील तक्रार जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडे जिल्हा रुग्णालयात, तालुका स्तरावर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षकांकडे, महानगर पालिकेत, मुख्य आरोग्य अधिका-याकडे किंवा वॉर्ड ऑफिसरकडे तक्रार दाखल करू शकतो. तक्रारदाराची संपूर्ण माहिती गोपनीय ठेवली जाते. तक्रार आल्यापासून २४ तासात त्याची नोंद घेणे समुचित प्राधिका-यांवर बंधनकारक आहे. लेक लाडकी अभियान शिरुर (का) (२)