पान:सयाजीरावांचा सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक सुसंवाद.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 धर्मसुधारणांसाठी कायद्याची सांगड :
 आपण जेव्हा सुधारणांचा विचार करतो, त्यावेळी शिक्षण, प्रशासन आणि सामाजिक सुधारणा संबंधानेच बरेचदा बोलले जाते. मात्र महाराजा सयाजीरावांनी धर्मसुधारणांसंबंधी घेतलेले निर्णय हे तत्कालीन काळातील साहसी आणि दूरदृष्टीचे होते. सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास केलेल्या या राजाने ओळखले होती की, सर्व धर्मांची मूळतत्त्वे चांगली आहेत; पण धर्माच्या पांघरुणाखाली कर्मकांडातून होणारे धार्मिक स्तोम सर्वसामान्यांची व एक प्रकारची फसवणूक आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनात धर्मासंबंधीची श्रद्धा, आदर असावा, आपापल्या ईश्वराची प्रार्थना करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे; पण यात कोणा मध्यस्थांची गरज नाही. त्यांनी ओळखले, कुळाचार पाळणे हा जनतेचा अधिकार असला तरी, पूजाअर्चाचा अधिकार अमुक माणसांकडे किंवा जातीकडे असावा, याबद्दल वेदात उल्लेख नाही. हे सयाजीरावांना धर्म अभ्यासातून लक्षात आल्याने त्यांनी हिमतीने एक निर्णय घेतला. शिक्षण विभागाचा भाग म्हणून धर्मखाते सुरू केले. हिंदू कायदा कोणत्याही सत्ताधीशाने बनविलेला नसला तरी, तो ईश्वरनिर्मित आहे, अशी अनेक वर्षांची परंपरा आहे. आधुनिक काळाशी सुसंगत

धर्म सुधारणा करणे हे राजाचे कर्तव्य आणि अधिकार आहे या ठाम भूमिकेत धर्मविषयक कायद्यांची महाराजांनी पुढीलप्रमाणे

सयाजीरावांचा सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक सुसंवाद / १४