पान:सयाजीरावांचा सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक सुसंवाद.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 सयाजीराव महाराजांचा धर्माबद्दल आदर होता; पण धर्मात जेव्हा तत्त्वाज्ञानापेक्षा रूढी अन् परंपराच्या जागी अंधश्रद्धांना महत्त्व प्राप्त होते, त्यावेळी धर्मव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या राजाने धर्म तत्त्वांची चिकित्सा करणे अगत्याचे असते. या कर्तव्य भावनेने सयाजीराव तत्कालिन विचारवंतांशी, अभ्यासकांशी गाठीभेटी घेऊन चर्चा करत असत. त्यात होते कडकडीत प्रबोधनकार राजारामशास्त्री भागवत, आर्य समाजाचे नित्यानंद स्वामी, ख्रिस्त अभ्यासक जनरवूथ, संस्कृत पंडित हंसस्वरूप, वेदशास्त्रसंपन्न काशीनाथ लेले किंवा वामनशास्त्री इस्लामपूरकर, विदूषी अॅनी बेझंट, शेतकऱ्यांचे कैवारी जोतीराव फुले, सुधारक न्यायमूर्ती महादेव गो. रानडे, बहुजनाच्या शिक्षणासाठी काम करणारे ॲडव्होकेट गंगाराम भाऊ म्हस्के, बौद्ध धर्माचे अभ्यास डॉ. आनंद नायर, सत्यशोधक समाजाचे रामचंद्र धामणसकर आणि त्यांच्या पदरी नोकरीवर असलेल्या योगी अरविंद घोष, बॅ. केशवराव व खासेराव जाधव - या पंडितांशी त्यांचा वारंवार संवाद होई. यातून त्यांचा धर्मसंस्थेबद्दल जबाबदारीने आदर वाढत जाऊन त्यांनी हिमतीने बडोद्यात वरील धर्मसुधारणा केल्या.
कला-संस्कृतीचा वारसा राष्ट्राची संपत्ती :

 महाराजांनी हिंदवी संस्कृतीबद्दल अत्यंत अभिमान होता. इतिहास आणि तत्त्वज्ञान हे त्यांचे आवडीचे विषय असल्याने या अभ्यासातून त्यांनी जगभरातील संस्कृतीचा अभ्यास केला. पुढे आयुष्यभरात २७ वेळा केलेल्या जगप्रवासातून त्यांनी

सयाजीरावांचा सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक सुसंवाद / १७