पान:सयाजीरावांचा सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक सुसंवाद.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



बलवान राष्ट्राची बलस्थाने कोणती आहेत याचा जेव्हा शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आले शिक्षणासोबत साहित्य, कला, संस्कृतीचा वारसा हेच राष्ट्राच्या समृद्धीचे एक माप आहे. त्यामुळे कोणत्याही राष्ट्राची समृद्धी ही जशी शिक्षण-उद्योगांच्या प्रगतीवर समजली जाते, तेवढीच त्या राष्ट्राच्या साहित्य, कला, संगीत आणि शिल्पकलांच्या वारशावरूनही मोजली जाते. यावर मूळ उपाय म्हणून सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षणाची पाणपोई सुरू केली. मुलगा-मुलगी शाळेत आली नाही तर पालकास दिवसात दोन आणे दंड सुरू केला. हिंदुस्थानातील ज्ञानाचा हा पहिला प्रयोग होता. हे ओळखलेल्या तरुण सयाजीरावांनी शिक्षण हाच प्रशासन, न्याय, शेती-उद्योग आणि साहित्य-कला या सांस्कृतिक वारशाचा मोठा आधार आहे. या कामांची पायाभरणी करण्यासाठी त्यांनी प्रत्येक गावात शाळा सुरू केल्या. जनतेतील साक्षरता टिकून राहावी म्हणून गावोगाव वाचनालये सुरू केली. वाचनालयासाठी पुस्तके हवीत म्हणून वेगवेगळ्या लेखकांना ग्रंथलेखनास मदत करून ग्रंथव्यवहाराचे ते पोशिंदे झाले. माणसांची गायन, संगीत, नाटक, चित्रकला या कला गुणांची आवड असते. यातून इ.स. १८९० साली बडोद्यात कलाभवनाची सुरुवात केली. या सांस्कृतिक सुधारणा केंद्रातून हिदुस्थानातील साहित्य, संगीत, शिल्पकला, चित्रपट, नाट्य, तंत्रज्ञ, शिल्पकार तयार झाले. एवढेच नाही तर या देशाचा

सयाजीरावांचा सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक सुसंवाद / १८