पान:सयाजीरावांचा सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक सुसंवाद.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 धर्म आणि धर्म संस्थेबद्दल आदर असलेल्या सयाजीरावांनी धर्माने गरिबांचा कैवारी बनावे आणि परमेश्वर हा प्रत्येक माणसात असल्याने गरीब - वंचिताची सेवा यातच राजाचा मोक्ष असतो, हे सांगून आचरणात आणणारे हे एक प्रज्ञावंत सुप्रशासक होते. त्यांनी एका भाषणात सांगितले, 'जर आपले साधुसंत, स्वामी, महाराज आणि ब्रह्मचारी स्वतःचे द्रव्य आणि शक्ती समाजातील चांगल्या कामासाठी खर्च करतील, तर देश प्रगतीचे पुष्कळचे कार्य होईल. आज हे लोक जनतेचा पैशा उधळत आहेत." यावर राजप्रमुखाने जनकल्याणासाठी जबाबदारी पाऊले उचलली पाहिजेत, ते सयाजीराव वारंवार सांगत. याची गंभीपणे विचार करण्याची आजची गरज आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या काळातील सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक सुसंवाद या सुप्रशासनाच्या धोरणांचा हा अल्प आढावा पूर्ण करताना मी एका वाक्यात समारोप करत आहे. ते वाक्य आहे, महाराजा सयाजीराव हे आधुनिक भारताचे एक शिल्पकार आहेत, हे आपण समजून घेतले पाहिजे. आजच्या वर्तमानावर प्रज्ञावंत सयाजीरावांची ओळख समाज सुसंवाद आणि स्वास्थ्यासाठीचे एक उत्तर आहे.

●●●
सयाजीरावांचा सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक सुसंवाद / २१