पान:सयाजीरावांचा सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक सुसंवाद.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सयाजीरावासारख्या जिज्ञासू आणि प्रजाहिताचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण राजाने शिकत असताना हिंदुस्थान आणि जगाच्या इतिहासाची तोंडओळख करून घेतली. जगावर राज्य करणाऱ्या इंग्रज सरकारची ताकद शिक्षण अन् प्रशासन कौशल्यातच आहे, हे त्यांनी ओळखले. अठराव्या वर्षी प्रत्यक्ष राज्यकारभार हाती येताच राज्यभर फिरून त्यांनी भूप्रदेश अन् रयतेची ओळख, त्यांचे प्रश्न समजून घेतले. पावसावर अवलंबून असलेली बेभखशाची शेती आणि शिक्षणाचा सर्वत्र अभाव हे समोर आले. रयतेची ही अवस्था बघून त्यांनी एक वर्षात जंगलात अन् गावकुसाबाहेर राहणाऱ्या वंचित अन् अस्पृश्य प्रजेसाठी सरकारी खर्चाने शिक्षण, निवास व्यवस्था अन् पाटी-पुस्तके देण्याचा समाजक्रांतीचा हुकूम काढला. सामाजिक सुधारणाची ही भक्कम पायाभरणीची सुरुवात होती.
विलायत प्रवासाने ज्ञानभांडाराचा खजिना हाती आला :

 राज्यकारभार हाती येण्याअगोदर महाराजांचा प्रथम विवाह १० जानेवारी १८८० साली तंजावरच्या लक्ष्मीबाई मोहितेशी झाला. गृहसौख्य आणि राजकारभार एकाच वर्षी सुरू झाले. या दोन्ही आघाड्यांवर त्यांनी आनंद आणि उत्साहाने काम सुरू केले; पण त्यांच्या संसार सुखाला चारेक वर्षात दृष्ट लागली. पत्नी महाराणी चिमणाबाईंचे अल्पशा आजाराने ७ मे १८८५ ला दु:खद निधन झाले. राजगादीचा वारस बालक राजपुत्र फत्तेसिंग सयाजीरावांवर दुःखाचा डोंगर कोसळला. यातून त्यांना

सयाजीरावांचा सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक सुसंवाद / ८