पान:सयाजीराव गायकवाड - धर्मविषयक विचार.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



सयाजीराव गायकवाड
धर्म विषयक विचार

 महाराज सयाजीराव चौसष्ट वर्षांची कारकीर्द म्हणजे विविध सुधारणांचा चालता बोलता इतिहास आहे. राज्यकारभार हाती येताच या राजाने जनकल्याणासाठी पंचसूत्री कार्यक्रमाची आखणी केली. १) शिक्षणाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, ते प्रजेला देणं पहिलं काम. २) उद्योगधंदे आणि व्यापार ही प्रगतीची दोन चाकं आहेत, त्यामुळे श्रीमंत-गरिबातील अंतर कमी करता येईल. ३) उच्चनीच, हा श्रेष्ठ तो कनिष्ठ या भावनांचा प्रत्येकाने त्याग करावा. ४) सुख आणि दुःख हे आयुष्यातील सावलीचा खेळ आहे, म्हणून 'कर्तव्य आणि कर्म करण्यातच मोक्ष आहे.५) कोणतेही काम करताना स्वार्थ आणि फळाची अपेक्षा न करणे हाच धर्म आहे,

 तरुणपणातील सयाजीरावांचे चौफेर वाचन, सर्वसंग्राहकता, बुद्धीची परिपक्वता आणि निरनिराळे धर्म-संस्कृतीचा तौलनिक अभ्यास झाल्याने त्यांची दृष्टी विशाल बनत गेली. या व्यासंगाचे चित्रण त्यांच्या एकूण भाषणात, लेखनात आणि पत्रव्यवहारात

सयाजीराव गायकवाड धर्म विषयक विचार / ६