हे पान प्रमाणित केलेले आहे.

कटुता ? ज्योतीला हे ऐकून धक्काच बसला होता. अतुल आणि विनी हे एक बऱ्यापैकी सुखी जोडपं आहे अशी तिची कल्पना होती. विनी ही तिच्या मैत्रिणींच्यात सगळ्यात जास्त बडबडी, हसरी, उत्साही बाई होती. आपण स्वतः जशा आहोत अशी ज्योतीची कल्पना होती त्याच्या ती अगदी उलट होती. गोरी, गोल-गुबगुबीत, सदा मोठमोठ्याने हसणारी. भडक कपडे घालून तोंडाला भडक रंग फासणारी. अशा बाईला अचेतन गोळयासारखं वाटत होतं आणि आपल्याला वैवाहिक आयुष्यात जे हवं होतं ते न दिल्याबद्दल ती आपल्या नवऱ्याला दोषी धरीत होती. ज्योतीला असा जीवनानं चकवल्याचा अनुभव कधीच आला नव्हता. आपण सामान्य, कुरूप, सर्वस्वी अनाकर्षक आहोत अशी तिची पहिल्यापासून कल्पना असल्यामुळे तिच्या जीवनाबद्दलच्या अपेक्षा फार मामुली होत्या, आणि म्हणून तिला जे काही मिळालं ते म्हणजे एक अलौकिक चमत्कार आहे असं म्हणून तिन स्वीकारलं.
 विनीनं असं म्हटल्यावर तिनं विनीला विचारलं होतं, " तुला हे असं वाटतं असं तू अतुलला कधी बोललीयस ?"
 विनी हसली. " त्याचा विश्वासच बसणार नाही. त्याला वाटल माझं डोकंबिकं फिरलंय एकाएकी. त्याच्या मते मी अतिशय सुखी आहे, आणि नाही याचा पुरावा हातात आला तरी तो त्याला खोटाच समजेल."
 रामनेही तेच केलं नव्हतं का? की आपण सगळेचजण असे असतो, आपल्याला ज्याच्यावर विश्वास ठेवायचाय त्याच्यावरच ठेवतो आणि त्या विश्वासाला तडा जाणाऱ्या गोष्टी बघायला, ऐकायला नकार देतो?
 पुन्हा ती अमरबद्दल विचार करायला लागली. तो त्यांना जसा वाटला तसा कधी नव्हताच का ? पण असं कसं शक्य आहे ? मग काय तो एकदम ओळखसुद्धा येऊ नये इतका बदलला ? त्याचीही शक्यता कमीच.
 रामने सेल्समनसाठी जाहिरात दिली होती. त्या नोकरीसाठी

१३० : साथ