हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३



 तारेत फक्त एकच शब्द होता. " अभिनंदन." ही खास स्मिताची स्टाइल. तिचं संभाषण किंवा पत्र म्हणजे तिच्या इतरांशी - विशेषतः आईबापांशी - सतत चालू असलेल्या युद्धातला एक नवा डावपेच असायचा.
 तिनं तार पाठवली हयाचा अर्थ तिची प्रतापशी गाठ पडली असली पाहिजे. ती दोघं एकमेकांना वरच्यावर भेटायची- प्रतापमधे अशा पुष्कळ गोष्टी होत्या की त्या दुसऱ्या कुणाच्या असत्या तर तिने त्यांच्यावर कडाडून टीका केली असती. पण ती इतरांना लागू करत असलेले निकष प्रतापला लागू नसत. ती त्याची धाकटी बहीण होती तरी ती त्याच्या बचावाला धावून जाण्यात आणि त्याच्या दोषांवर पांघरूण घालण्यात तत्पर होती. प्रताप येऊन गेल्यावर स्मिताकडून काही पत्र येतंय का किवा स्वतःच येते की काय याची ज्योती वाटच पहात होती. बहुतेक येणार नाही असं वाटत होतं.आणि पत्राऐवजी ही तार

१४० : साथ