हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४



 " ज्यो, तू इथं कशी ? की तुम्हीही पुण्याच्या उकाड्यातनं वीकेण्डसाठी पळून आलायत ? राम कुठेय ?"
 ही अर्थात विनी शहा होती. एखाद्या समारंभाला निघाल्यासारखे कपडे, तोंडाला भरपूर रंग, अंगावर किलोभर सोन्याचे दागिने. ज्योतीला वाटलंच होतं की बाजारात गेलं की ओळखीचं कुणीतरी भेटणार. पण तिची कोल्ड क्रीम संपली होती, आणि वयपरत्वे शुष्क झालेल्या कातडीमुळे तिला कोल्ड क्रीमशिवाय राहणं अशक्य होतं, तेव्हा ती आणायला बाजारात जाणं भाग होतं.
 " मी एकटीच आलेय इथे, "
 ती म्हणाली. विनीनं आधीच कोरून बाक दिलेल्या भुवयांना आणखीच वाकवीत विचारलं, " खरं? हे कसं झालं?"
 " मला जरा थकवा वाटत होता. गेल्या महिन्यात फ्लू झाला होता ना, त्यातनं मी अगदी संपूर्ण बरी झालेच नव्हते. शेवटी

साथ : १५५