हे पान प्रमाणित केलेले आहे.

परिपक्व होतंय असा आभास निर्माण झाला होता. पण खरंतर हया दर्शनी भिंतीच्या मागे त्यांच्या नकळत ते हळूहळू कमकुवत होत ढासळत होतं. आयुष्यातल्या बाकी सगळया बाबींचे अत्यंत काळजीपूर्वक तपशीलवार आराखडे आखणारा राम ह्या बाबतीत अपयशी ठरला होता. पण कदाचित असंही असेल की माणसा - माणसांतल्या नात्याचे आराखडे आखता येत नाहीत. मग करायचं काय ? नातं जसा आकार घेईल तसा त्याला घेऊ द्यायचा आणि अशी वेळ आली की ते आपल्याला स्वीकार्य वाटत नाही, की ते सोडून निघून जायचं? हे फारच लहरी आणि विक्षिप्त झालं. ज्योतीची खात्री होती की आपण लहरी नाहीयोत. आल्या परिस्थितीत आपला निर्णय विचारपूर्वक घेतलेला आणि अटळ आहे. जिथे मला आयुष्यात मिळाव्या असं वाटत असलेल्या कुठल्याच गोष्टी मिळू शकत नाहीत तिथे मी रहाणार नाही. एवढं नक्की. आणि एवढं सध्या पुरे आहे. मग मी पुढे काय करणार, कुठे जाणार हे सगळं आपोआप सुचत जाईल, एवढे सगळे दिवस हे ठरवण्याचा प्रयत्न करण्यात मी वाया घालवले. आता तिला कळून चुकलं की ज्या भविष्यकाळाशी मुकाबला करायचा तो येऊन ठेपल्याशिवाय त्याच्याबद्दल नुसता विचार करणं व्यर्थ आहे. एकदा त्यात स्वतःला झोकून दिलं म्हणजे येणाऱ्या परिस्थितीला कसकसं तोंड द्यायचं ते आपोआप सुचत जाईल.
 त्या रात्री तिला झोप आली नाही, पण झोपेची गोळी वगैरे न घेता ती खोलीत येरझारा घालीत किंवा डोळे मिटून बिछान्यावर स्वस्थ पडून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पेटीत कपडे भरताना ती शांत होती. तिच्या इतक्या दिवसांच्या विचारमंथनातून फारसं काही निष्पन्न झालं नसलं तरी आता तिनं ठाम निर्णय घेतला होता आणि त्यामुळे ती स्थिरचित्त होती.
 नाश्ता घेत असताना तिला फोन आहे म्हणून निरोप आला. क्षणभर मी नाहीये असं सांगा असं म्हणण्याचा तिला मोह झाला. तिनं जो निर्णय घेतला होता तो असा फोनवर त्याला सांगण्याची तिची इच्छा नव्हती. मग तिनं विचार केला. नुसतं मी आज परत

साथ: १६७