हे पान प्रमाणित केलेले आहे.

दु:खं, त्यांचे प्रश्न, त्यांच्या श्रद्धा सगळंच तिच्यापेक्षा वेगळं होतं. जीवनापासून त्या फार थोड्याची अपेक्षा करीत, आणि बरेचदा ते थोडकंसुद्धा त्यांना लाभत नसे, तरी त्या हसतमुखाने आला दिवस पार पाडीत. त्यांच्या मनात जे काही असेल ते सगळं स्पष्ट वाचता यायचं, अगदी त्यांचा खोटेपणासुद्धा, कारण त्यालाही एक ठराविक रीत होती.
 राम म्हणायचा, "एका ठराविक मर्यादेपर्यंत त्यांच्याशी सलगी ठीक आहे, पण त्यामुळे त्या तुझ्याकडून नको ते फायदे उपटत नाहीत ना ते बघ. तुला वाटतं तितक्या त्या सरळ आणि भोळया मुळीच नाहीत. तू मऊ आहेस असं एकदा त्यांना वाटलं की त्या कोपरानं खणायला सुरुवात करतील. कुठे उचल माग, नाहीतर आजारी असताना कामावर ये आणि गुपचुप कोपऱ्यात झोपून रहा, असल्या गमजा सुरू होतील. मग मात्र त्यांच्याशी कडकपणे वागणं तुला शक्य होणार नाही."
 " त्यांना असा माझा फायदा घेऊ द्यायला मी काही दूधखुळी नाहीये."
 पण त्याचं थोडंफार बरोबर होतं हे तिला कबूल करावं लागलं. नियमावर बोट ठेवल्यामुळे एखादीचे हाल होणार आहेत हे दिसत असलं की ते कठीण जायचं. एक बाई एक दिवस लहान मूल बरोबर घेऊन आली. त्याला प्रोसेसिंग शेडच्या बाहेर झोपवलं. आणि मग ती वरच्यावर त्याला पाजण्यसाठी बाहेर जायला लागली.
 ज्योती रागावली तेव्हा ती म्हणाली, 'बाई, पोर लई आजारी हाय. सारखं रडतं. जरा पाजलं की तेवढ्यापुरतं गप बसतं. जास्त वेळ नाही जात मी बाहेर. नुसतं पाजण्यापुरतं. तेवढा वेळ भरून काढीन मी जादा काम करून."
  ज्योतीनं मान हलवली. " ते चालायचं नाही पुष्पाबाई. पोर आजारी असलं तर थोरल्या मुलीला त्याच्यापाशी बसायला सांगा, नाहीतर मग तुम्ही घरी रहा."
 ज्योतीला माहिती होतं की त्यांची थोरली मुलगीसुद्धा कामाला

४६ : साथ