पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/142

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६. बालगुन्हेगार
७. बालविवाहिता
८. विधिसंघर्षग्रस्त बालके (कायद्याचे बळी)
९. पालकांअभावी वाढणारी मुले-मुली
१०. लैंगिक अत्याचारपीडित बालके / बालिका
११. लिंग परिवर्तनास बळी पडलेल्या मुली
१२. अमानवी व्यापारातील मुले / मुली
१३. घरगडी / सालदार गुलाम बालके
१४. भिकारी मुले / मुली
१५. अमली पदार्थ व्यापारातील वाहक बालके
१६. मनोरंजनातील बळी मुले-मुली (सर्कस, खेळ, शौकइ.)
१७. अल्पवयीन वेश्या / देवदासी
१८. लैंगिक क्लिप्स / व्हिडिओ / फिल्मनिर्मितीतील बळी बालके
१९. अल्पवयीन आतंकवादी मुले / मुली
२०. अनाथ, अनौरस, चुकलेली, सोडलेली, घरातूनपळालेली,भंगित
   कुटुंबग्रस्त अपत्ये, रोग, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, विकास
   योजनाग्रस्त (धरणग्रस्त, सेजग्रस्त इ.) मुले, मुली; शिवाय अंध,
  अपंग, मतिमंद, मूक, कर्णबधिर इ.
अदृश्य उपेक्षा
 हे नुसते प्रकार पाहू लागलो तरी आपल्याला याची खात्री पटेल की, समाजात सुखी मुले अल्पसंख्यच असतात. आपल्या समाजात बालकांची जी उपेक्षा करणारी, शोषण अत्याचाराची कारणे आहेत व ती पाहता आपण त्यांच्याकडे माणूस, जीव न पाहता जीवघेण्या पद्धतीने त्यांना वाढवतो हे लक्षात येते. विशेषतः ६ वर्षे वयोगटाच्या आतील अर्भक, बालकांचा विचार करताना असे दिसते की, त्यांच्या परावलंबन व असाहाय्यतेमुळे जी एक विशिष्ट स्थिती निर्माण होत असते, ती स्थितीच एक तणावग्रस्त मरणयातना देणारी असते. रोगग्रस्त, अपंग, मतिमंद, बहुविकलांग अपत्ये यांच्या व्यथा वेदनांची तर आपण कल्पनाच करू शकत नाही. अज्ञान, दारिद्यामुळे पालकांचे होणारे दुर्लक्ष केवळ अक्षम्य! मुलांची दिसून न येणारी उपेक्षा तरी किती? भावनिक, मानसिक, शारीरिक इ. मुलगी झाली म्हणून


सामाजिक विकासवेध/१४१