पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ ऋषि- अतीन्द्रियार्थदर्शिनं. सुमेधां शोभनप्रज्ञ. मराठी अर्थ -[ इन्द्रादिक ] देवांनी [सुद्धां] व मनुष्यांनीं [ ही ] सेवित (जुष्टं ) अशा ह्या [ ब्रह्मात्मक ] वस्तूचा ( इदं ) उपदेश मी स्वतःच करितें (अहं स्वयमेव वदामि ). ज्या पुरुषाचें ज्या पुरुषाचें [ रक्षण करण्याची ] मी इच्छा करितें ( यं कामये ) त्याला त्याला मी सर्वापेक्षां श्रेष्ठ (उम्र) करितें (कृणोमि ), त्याला मी ब्रह्मा करितें ह्म० सृष्टि उत्पन्न करण्याची शक्ति देते, त्याला अतीन्द्रिय अर्थाचे ज्ञान होण्याचे सामर्थ्य देतें ( तं ऋषिं कृणोमि ) [ आणि ] त्याला उत्तम प्रज्ञावान् करितें ( तं सुमेधां कृणोमि ). ऋचा ६ वी :- रुद्राय = रुद्रस्य षष्ठ्यर्थे चतुर्थी. अहं रुद्राय धनुरातनोमि = पुरा त्रिपुरविजयसमये महादेवस्य चापं अहं ज्या आततं करोमि . ब्रह्मद्विषे ब्राह्मणानां द्वेष्टारं. शरवे-शरुं, हिंसकं [ त्रिपुरनिवासिनं असुरं ]. हन्तवै=हन्तुं, हिंसितुं. ऊं --- उशब्द: पूरक:. जनाय= स्तोतृजनार्थ. समदं = समानं माद्यन्ति अस्मिन्निति समत्संग्रामः तं संग्रामं. आविवेश = प्रविष्टवती. मराठी अर्थ - ब्राह्मणांचा द्वेष करणारा ( ब्रह्मद्विषे ) [आणि] शरु ह्म० हिंसक असा जो [त्रिपुरनिवासी असुर ] त्याला मारण्याकरितां ( हन्तवै ) [ त्रिपुरविजयाच्या वेळी ] महादेवाचें ( रुद्राय = रुद्रस्य ) धनुष्य ( धनुः ) आठ- णारी मी होय ( आतनोमि ). [ आपल्या स्तोतृ ] जनाकरितां (जनाय ) दुष्ट