पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०१ २ मराठी अर्थ - समुद्राचे ठायीं (समुद्रे) असणारें जें उदक त्या मध्ये (अप्सु अन्तः ) माझें कारण [ ह्म० माझा पिता जो अम्भृण आहे (मम योनिः ). तो ३ मराठी अर्थ - अंतरिक्षाचे ठायीं (समुद्रे) असणारी जी अम्मय अशीं [ देवशरीरें ] त्यांच्यामध्ये ( अप्सु अन्तः ) [ असणारें जें चैतन्य तें ] माझें कारण आहे ( मम योनिः ). अन्तिम दोन चरणांचा मराठी अर्थ - [ अशा प्रकारची मी आहे ] झन (अतः ) सर्व भूतजातांना ( भुवनानि विश्वा ) [ त्यांच्या ठायीं प्रवेश करीत होत्साती विविध रूपांनी मी व्यापून राहते ( वितिष्ठे विविधं व्याप्य तिष्ठामि ) आणि त्याचप्रमाणे, हा [ फार दूर अंतरावर असलेला जो ] स्वर्ग लोक ( अमूं द्यां ) [ त्यानें उपलक्षित जो सर्व कार्य समुदाय ] त्याला मी [ आपल्या मायात्मक ] शरीरानें ( वर्ष्मणा ) स्पर्श करितें ( उपस्पृशामि ) झ० व्यापून टाकितें. ऋचा ८ वी:- अहमेव = [ परेण अनधिष्ठिता ] अहं स्वयमेव, दुसन्या के णाचीही मदत नसून मी स्वतःच. वात इव = यथा वातः [ परेण अप्रेरितः सन् स्वेच्छयैव ] प्रवा तद्वत्. प्रवामि = प्रवर्ते. आरभमाणा=[ कारणरूपेण ] उत्पादयन्ती. भुवनानि=भूतजातानि. दिवा पर:- दिवः आकाशस्य परस्तात्, आकाशाच्या पलीकडे. " परः " इति सकारान्तं " परस्तात्" इत्यर्थे वर्तते यथा “ अधः " अधः " इति " “ अधस्ताद- र्थे,” तद्योगे च तृतीया सर्वत्र दृश्यते. “ परः " हें " परस्तात्" ह्या अर्थी आहे व जेव्हां जेव्हां " परः 3366 “ (परस् ) " त्याचा त्याचा " परस्तात् " असा अर्थ असतो