पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा श्रीभगवानुवाच - ९७ काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः । महाशनो महापाप्मा विद्धयेनमिह वैरिणम् ॥ ३७ ॥ सम० - काम हा क्रोधही हाची जो रजोगुणसंभव । सदा अतृप्त जो पापी या मार्गी शत्रु जाण हा ॥ ३७ ॥ आर्या- कृष्ण म्हणे पार्था हा रजोगुणोद्भवचि काम हा क्रोध । प्रासक बहु पापी हा वैरी तूं जाण करुनियां शोध ॥३७॥ ओवी - देव म्हणे, गा पार्था । हे काम क्रोध वैरी जाण निभ्रांता । रजोगुणापासोनि होत असतां । निपजवती पापातें ॥ ३७ ॥ तंव हृदयकमळरामु । जो योगियांचा निष्काम कामु । तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइकें ॥ ३९ ॥ तरी हे काम को पाहीं । जयां कृपेची सांठवण नाहीं । हे कृतांताच्या ठायीं । मानिजती ॥ २४० ॥ हे ज्ञाननिधीचे भुजंग | विषयदरीचे वाघ | भजनमागचे मांग | मारक जे ॥४१॥ हे देहदुर्गांचे धोंड | इंद्रियग्रामींचे कोंड यांचें व्यामोहादिक दवड | जगावरी ॥ ४२ ॥ हे रजोगुण मानसींचे । समूळ आसुरियेचे । धालेपण ययांचें | अविद्या केलें ॥ ४३ ॥ हे रजा कीर जाहले । परी तमासी पैढियंते भले | तेणें निजंपद यां दिधलें । प्रमादमोहो ॥ ४४ ॥ हे मृत्यूच्या नगरीं । मानिजती निकियापरी । जे जीविताचे वैरी । म्हणऊनियां ॥४५॥ जयांसि भुकेलियां आमिपा । हें विश्व न पुरेचि घांसा । कुळवाडी यांचिया आशा | चाळीत असे ॥ ४६ ॥ कौतुकें कवळितां मुठी । जिये चवदा भुवनें थेंकुटीं । तिये भ्रांतिही धाकुटी | वाल्हीदुल्ही ॥ ४७ ॥ जे लोकत्रयाचें भौतुकें । खेळतांचि खाय कवतिकें | तिच्या दासीपणाचेनि 'विकें । तृष्णा यावर, योग्यांच्या निष्काम मनालाही रमविणारे, ते पुरुषश्रेष्ठ श्रीकृष्ण काय म्हणाले, “ अर्जुना, तें सांगतों, ऐक. ३९ वा, हा बलात्कार करणारे कामक्रोधच होत. यांच्या ठिकाणीं करुणेचा लेशही नाहीं. हे केवळ काळासारखे निपुर आहेत ! २४० हे ज्ञानाच्या ठेव्यावर वेटाळून बसलेले काळसर्प, किंवा विषयांच्या घळींमधले वाघ, किंवा ईश्वरभक्तीच्या वाटेवरले प्राणघातक मांगच समजावे. ४१ हे या शरीररूपी डोंगरावरचे धांडे, किंवा इंद्रियांच्या गांवातले कोंडकोंपरे, आहेत असें जाणावें. यांचं दडपण सर्व जगावर पडलेले आहे. ४२ हे रजोगुणाने व्यापलेल्या मंत्रामधले राक्षस आहेत आणि अज्ञानाच्या अन्नावर हे चरत असतात. ४३ हे रजोगुणापासून उत्पन्न झालेले खरे, पण तमोगुणाला हे विशेष आवडते वाटतात, म्हणून त्या तमोगुणानें आपले स्वभावधर्म जे प्रमाद, मोह, ते त्यांना देऊन टाकले आहेत. ४४ हे कामक्रोध जीवित घेणारे असल्याकारणानें, यांचा मृत्यूच्या राजधानीत मोठाच मान आहे. ४५ यांची भूक एकदां चाळवली म्हणजे यांना संबंध विश्व एका घांसालाही पुरत नाहीं. यांचा हात जसजसा चालेल, तसतशी यांची आशा अधिकाधिक चवचाल होत जाते. ४६ तशीच आशेची धाकटी बहीण 'भ्रांति ' यांना फार प्रिय आहे; ही भ्रांति अशी आहे, कीं, हिनें एकदां मृठ सहज आवळली, कीं, चवदाही भुवनें तेथें कोठच्या कोठेच गडप होतात ! ४७ ही भ्रांति अशी विलक्षण आहे, कीं भातुकलीच्या खेळांतच ही त्रैलोक्याचा चट्टामट्टा करिते, आणि १ आवडते. २ आपले वतन. ३ जमीनजुमला ४ खाद्य खाऊ. ५ बळानें, जोरावर. १३