पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी मज सहजातें करिती । स्वयंभातें प्रतिष्ठिती । निरंतरातें आव्हानती । विसर्जिती गा ॥ ६३ ॥ मी सर्वदा स्वतः सिद्धु । तो कीं बाळ तरुण वृद्ध | मज एकरूपा संबंधु । जाणती ऐसे ॥ ६४ ॥ मज अद्वैतासि दुजें । मज अकर्तेयासि काजें । मी अभोक्ता की भुंजें । ऐसें म्हणती ॥ ६५ ॥ मज अकुळाचें कुळ वानिती । मज नित्याचे निधनें शिणती । मज सर्वांतरातें कल्पिती। अरि मित्र गा॥ ६६ ॥ मी स्वानंदाभिरामु । तया मज अनेक सुखाचा कामु । आघवाचि मी असें समु । कीं म्हणती एकदेशी ॥ ६७ ॥ मी आत्मा एक चराचरीं । म्हणती एकाचा कैंपक्ष करीं । आणि कोपोनि एकातें मारीं । हेंचि वाढविती ॥ ६८ ॥ किंबहुना ऐसे समस्त । जे हे मानुपधर्म प्राकृत । तयाचि नांव मी ऐसें विपरीत। ज्ञान तयांचें ॥ ६९ ॥ जंव आकार एक पुढां देखती । तंव हा देव येणें भावें भजती । मग तोचि विघडलिया टाकिती । नाहीं म्हणोनि ॥ १७० ॥ मातें येणें येणें प्रकारें । जाणती मनुष्य ऐसेनि आकारें । म्हणऊनि ज्ञानचि तें आंधारें । ज्ञानासि करी ॥ ७१ ॥ मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः । राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः ॥ १२ ॥ सम० – वृथा आशा वृथा कमैं वृथा ज्ञानें कुबुद्धिचीं। राक्षसी आसुरी मूढा प्रकृती ज्या तदाश्रित ॥ १२ ॥ आर्या- आशा कर्म ज्ञानहि वृथा जयांचे सकाम मंदमती । जैं दैत्यराक्षसांची मोहकरी प्रकृति होउनी भ्रमती ॥१२॥ ओवी — या पुरुषांची आशा निष्फळ । तैसेच कर्म आणि ज्ञान चंचळ | त्यांची गति न निर्मळ । राक्षसी आसुरी मोहिनी योनि पावती ॥ १२ ॥ ते घडवितात; मी स्वयंभू असतां, माझी प्राणप्रतिष्ठा करतात; आणि मी सदासर्वदा अखंड सर्वत्र व्यापक असतां, माझें आवाहन व विसर्जन करतात. ६३ मी नेहमींचा स्वयंसिद्ध आहें, परंतु माझ्या अविकृत एकरूपाशीं बाल्य, तारुण्य, व वार्धक्य, यांचा संबंध आपल्या बुद्धीनें जोडतात. ६४ मी द्वैतहीन असतांही दुजेपण माझ्या अंगीं डसवितात; मी निष्क्रिय असतां माझ्या ठिकाणी क्रियेची संभावना करतात; आणि मी अभोक्ता असतांही भोग उपभोगतों, असं समजतात. ६५ मला कुळगोत नसतांही, माझ्या कुळाचें वर्णन करतात; मी अविनाशी असतांही माझा मृत्यु कल्पून कष्टी होतात; मी सर्वाच्या अंतरांत सारखाच ओतप्रोत असतां, माझ्यासंबंधें शत्रुमित्रभावाची संभावना करतात. ६६ मी आत्मानंदाचा प्रत्यक्ष आगर असतां, मला नाना सुखांची इच्छा आहे असें समजतात, आणि मी सर्वत्र समभावानें व्यापक असतां, मला एकदेशी म्हणजे अमुक एका स्थलविभागांत राहाणारा असें म्हणतात. ६७ मी समस्त चराचराचा आत्मा असतां, मी एकाचा पक्ष धरतो आणि दुसऱ्या कोणा एकावर रागावून त्याला मारतों, अशी माझी कीर्ति हे पसरवितात ६८ सारांश, अशा प्रकारचे जे नाना मनुष्यधर्म आहेत, त्यांलाच ते 'मी' असें नांव देतात. अशा रीतीनें त्यांच्या ज्ञानाचे स्वरूप खन्याच्या अगदी उलट असते. ६९ एकादी मूर्ति पुढे पाहिली म्हणजे हा देव असं म्हणतात, पण तीच मूर्ति भंगली म्हणजे हा देव नाहीं म्हणून फेकून देतात. १७० तेव्हां अशा नाना तहांनीं मी साकार मनुष्यच आहे, असे ते मानतात, आणि म्हणून त्यांचें तें विपरीत ज्ञान खऱ्या ज्ञानाला काळोखांत ठेवून दृष्टीआड करतें. ७१ १ पक्षपात, साहाय्य,