पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पहिला आदिलोपासोनि पाडें । जियापरी ॥ ४३ ॥ नाना घनीभूत सुवर्ण । जैसें न्याहाळतां साधारण | मग अळंकारी बरवेपण | निवांडु दावी ॥ ४४ ॥ तैसें व्यासोक्ती अलंकारिलें । आवडतें बरवेपण पातलें । तें जाणोनि काय आश्र यिलें | इतिहासीं ॥ ४५ ॥ नाना पुरनिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरूनि आंगीं । पुराणें आख्यानरूपें जगीं । भारता आलीं ॥ ४६ ॥ म्हणऊनि महाभारतीं नाहीं । तें नोहेचि लोकीं तिहीं । येणें कारणें म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७॥ ऐसी जगीं सुरस कथा । जे जन्मभूमि परमार्था । मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥ ४८ ॥ जे अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम । परम मंगलधाम । अवधारिजो ।। ४९ ।। आतां भारतकमळपरागु । गीताख्यु प्रसंगु । जो संवादला श्रीरंगु । अर्जुनेंसीं ॥ ५० ॥ ना तरी शब्दब्रह्माब्धि । मथियला व्यासबुद्धी | निवडिलें निरवधि | नवनीत हें ॥ ५१ ॥ मग ज्ञानामिसंपर्के । कडसिलें विवेकें । पद आले परिपाकें । आमोदासीं ॥ ५२ ॥ जें अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनुभविजे संतीं । सोहंभावें पारंगतीं । रमिजे जेथ ॥ ५३ ॥ जें आकर्णिजे भक्तीं । जें आदिवंद्य त्रिजगतीं । ते भीष्मपर्वी संगती । सांघिजैल ॥ ५४ ॥ जे भगवद्गीता म्हणिजे । जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे । जे सनकादिकीं वसंतऋतु आला असतां ज्याप्रमाणें उपवनभूमींत लहानमोठ्या सर्व झाडांझुडपांवर वनश्रीचे भांडारच उघडते. ४३ अथवा ज्याप्रमाणें, सोन्याचे आटवलेले गोळे पाहिले असतां त्यांत कांहीं आकारवैशिष्टय दिसून येत नाहीं, परंतु त्याचे अलंकार केले म्हणजे खऱ्या शोभेचा प्रत्यय येतो. ४४ त्याप्रमाणें, व्यासांच्या वाणीचे अलंकार चढविल्यानें मनाजोगें सौंदर्य प्राप्त होतें. हा विचार मनांत आणूनच जणूं काय इतिहासानें या कथेचा आश्रय घेतला आहे. ४५ आणि आपल्याला योग्य मान लाभावा म्हणून जगांत लहानपण स्वीकारून सर्व पुराणंही या भारतग्रंथांतील आख्यानें झालीं आहेत. ४६ म्हणूनच जे भारतांत नाहीं, तें त्रैलोक्यांत कोठेच नाहीं, असें झाल्यामुळे 'व्यासोच्छिट जगत्रय ' अशी म्हणच प्रचारांत आली आहे. ४७ अशा रीतीनें जगांत परमार्थाचं मूलस्थान असलेली ही रसाळ कथा वैशंपायन मुनीनें जनमेजय राजास निवेदन केली आहे. ४८ तेव्हां जी अद्वितीय श्रेष्ठ, परम पुण्य- शील, अप्रतिम, आणि परमशुभ गतीचं स्थानच आहे, अशी ही कथा सावधपणे श्रवण करावी. ४९ आतां, भारतग्रंथरूपी कमलांतील परागच असें श्रीकृष्णानें अर्जुनाला सांगितलेले गीतानामक प्रकरण होय. ५० अथवा, सर्व वाङ्मयाचे मंथन करून व्यासाच्या बुद्धीनें हें गीतारूप अवर्णनीय नवनीत काढिलें. ५१ नंतर हे नवनीत ज्ञानाच्या आगीवर विवेकपूर्वक कढविल्यामुळे, कढणी उत्तम उतरून त्याचे खमंग तूप झालें. ५२ विरागी जिची इच्छा धरितात, सन्त जिचा प्रत्यक्ष अनुभव घेतात, आणि पूर्ण ब्रह्मज्ञानी जीमध्ये ' अहमेव ब्रह्मास्मि' या भावानें रममाण होतात. ५३ भक्त जिचें श्रवण करि- तात, जी त्रिभुवनीं प्रथम वंदिली जाते, जी भीष्मपर्वात कथेच्या ओघानें सांगितली आहे, ५४ जिला भगवद्गीता ही संज्ञा आहे, ब्रह्मा व शंकर जिची स्तुति गातात, आणि सनकादिक जिचें आदरानें सेवन १ लहानापासून मोठ्यापर्यंत. २ निर्णय, निश्रय. ३ अपरिमित, अपार, विपुल ४ अब्रह्म या बुद्धीनें. ५ सिद्धांनी.