पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीज्ञानेश्वरी सेविजे । आदरेंसीं ॥ ५५ ॥ जैसें शारदियेचिये चंद्रकळे - | माजीं अमृतकण कोंवळे । ते वैचिती मनें मवाळें । चकोरतलगें ॥ ५६ ॥ तियांपरी श्रोतां । अनुभवावी हे कथा । अति हळवारपण चित्ता । आणुनियां ॥ ५७ ॥ हें शब्देवीण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे । बोलाआधीं झोंविजे । प्रमे- यासी ॥ ५८ ॥ जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळें नेणती । तैसी परी आहे सेविती । ग्रंथीं इये ॥ ५९ ॥ कां आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंदु प्रकटतां । हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥ ६० ॥ ऐसेनि गंभीर- पर्णे । स्थिरावलेन अंतःकरणें । आथिला तोचि जाणे । मानूं इये ॥ ६१ ॥ अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणेया योग्य होती । तिहीं कृपा करूनि संतीं । अवधान द्यावें ॥ ६२ ॥ हें सलगी म्यां म्हणितलें । चरणांलागोनि विनविलें । प्रभू सखोल हृदय आपुलें । म्हणौनियां ॥ ६३ ॥ जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी वोवडी वाचा । तरी अधिकचि तयाचा । संतोष आधी ॥ ६४ ॥ तैसा तुम्हीं मी अंगिकारिला । सज्जनीं आपुला म्हणितला । तरी उणें सहजें उपसाहला । प्रार्थं काई ॥ ६५ ॥ परी अपराधु तो आणीक आहे । जे मी गीतार्थ कवळूं पाहें । ते अवधारा विनवूं लाहें । करितात, ५५ त्या त्या कथेची गोडी, जशीं चकोरांचीं पिलें अगदी हळुवार मनानें शरद्वतूंतील बारीक चंद्रकलेतले कोंवळे सुधाकण वेचतात, तशीच श्रोत्यांनीं आपलें मन नाजूक करून अनुभवावी. ५६, ५७ (कारण) ही कथा शब्दावांचून खरोखर सांगितली जाते, इंद्रियांस न कळतांच ही अनुभवास येते, आणि बोल कानी पडण्याच्या पूर्वी तिच्यांतील तत्त्वसिद्धांत आकलन केला जातो. ५८ ज्याप्रमाणें कमळांतील पराग भ्रमर घेऊन जातात, पण त्याची दादही कमळदळांना नसते, त्याप्रमाणेच हा ग्रंथ श्रवण करणारांची अवस्था आहे. ५९ आपलें ठिकाण न सोडतां, उगवत्या चंद्राला आलिंगन देणें व त्याचें प्रेम अनुभवणें हें कसब एक त्या कुमुदिनीलाच ठाऊक आहे. ६० तेव्हां अशा प्रकारें गंभीरवृत्तीनें ज्याचें अन्तःकरण निश्चळ झालें आहे, तोच हें गीताप्रकरण जाणूं शकतो. ६१ म्हणून जे गीताश्रवणप्रसंगीं अर्जुनाच्या पंक्तीस बसण्यास योग्य आहेत त्या संतांनीं कृपा करून या कथेकडे लक्ष्य द्यावे. ६२ मी या म्हणण्यांत जरा अमर्याद लगट केली आहे असे वाटेल; पण खरोखर तसा प्रकार नाहीं. श्रोते हो, आपण गंभीर व उदार अन्तः- करणाचे आहां, म्हणून मीं आपल्या चरणीं नम्र होऊन ही विनंति केली आहे. ६३ ज्याप्रमाणें आईबापांचा स्वभावच असतो, कीं, मूल जरी बोबडे बोल बोललें, तरी त्यांच्या संतोषाला भरतेंच यावे. ६४ त्याप्रमाणं, तुम्हीं जर माझा स्वीकार केला आहे, व मला ' आपला ' म्हटलें आहे, तर मग माझ्याकडून उणें घडेल तें सहन करा, अशी प्रार्थना कशास पाहिजे ? ६५ परंतु माझ्याकडून दुसराच एक अपराध घडला आहे, तो हा कीं, गीतेचा अर्थ स्पष्ट करण्याचे मी साहस करीत आहे; १ तलग पिलू २ क्षमा करण्याला,