पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४३८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः । सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १६ ॥ सम० निस्पृही शुद्ध जो दक्ष उदासी न मनीं व्यथा । आरंभ सर्वही टाकी आणि मद्भक्त तो प्रिय ॥ १६ ॥ आर्या- जो शुचि दक्ष गतष्यथ निस्पृह जो पूर्ण सुगुणराशीन । सर्वोद्योगत्यागी तो प्रिय मज भक्त अति उदासीन ॥ १६ ॥ ओवी - जया अपेक्षा नसे कांहीं । सदा शुचि दक्ष पाहीं । कर्मारंभ टाकूनही । असे तो मद्भक्त प्रिय ॥ १६ ॥ जयाचिया ठायीं पांडवा । अपेक्षे नाहीं रिगावा । सुखासि चढावा । जयाचें असणें ॥ ७२ ॥ मोक्ष देऊनि उदार । काशी होय कीर । परि वेंचे शरीर । तिये गांवीं ॥ ७३ || हिमवंतु दोप खाये । परि जीविताची हानि होये । तैसें शुचिव नोहे । सज्जनाचें ॥ ७४ ॥ शुचित्वें शुचि गांग होये । आणि पापतापही जाये । परि तेथें आहे । बुडणें एक ॥ ७५ ॥ खोलिये पारु नेणिजे । तरी भक्तीं न बुडिजे । रोकडाचि लाहिजे । न मरतां मोक्षु ॥ ७६ ॥ संताचेनि अंगलगें । पापातें जिणणें गंगे । तेणें संतसंगें । शुचित्व कैसें ॥ ७७ ॥ म्हणोनि असो जो ऐसा । शुचित्वें तीर्थां कुवासा । जेणें उलंघविले दिशां । मनोमळ ॥ ७८ ॥ आंतु वाहेरि चोखाळु । सूर्य तैसा निर्मळु । आणि तत्त्वार्थीचा पायाळु | देखणा जो ॥ ७९ ॥ व्यापक आणि उदास । जैसें कां आकाश । तैसें जयाचें मानस । सर्वत्र गा ॥ १८० ॥ संसारव्यथे फिटला । जो नैराश्ये विनटला । व्याधाहातोनि सुटला । विहंगु जैसा ॥ ८१ ॥ तैसा सतत जो सुखें । कोणीही टेवंच न देखे । नेणिजे अर्जुना, ज्याच्या अंतःकरणांत वासनेला प्रवेशच मिळत नाहीं, आणि ज्याच्या अस्तित्वानें सुखाला भरतीच येते; ७२ काशीक्षेत्र उदारपणें मोक्षलाभ करून देतें, परंतु कोणाला ? तर, त्या क्षेत्रांत ज्याचा देहपात होईल त्याला. ७३ हिमालयही पापाचा नाश करतो, पण या पापक्षालनांत प्राणाची हानि होते. पण सज्जनांच्या अंगीं जो पवित्रपणा आहे, तो अशा प्रकारचा नव्हे. ७४ गंगाजल पावनगुणाने पवित्र आहे, आणि तें पापतापांचा नाश करतें, पण त्याकरितां त्या पाण्यांत स्नान करावें लागतें आणि त्यामुळें बुडण्याची भीति असते. ७५ पण या भक्तिनदीच्या खोलीचा जरी थांग लागला नाहीं, तरी हींत भक्त कधींच बुडून नष्ट होत नाहीं. न मरतां जीवंतपणीच त्यास रोखठोक मोक्षाचा लाभ होतो. ७६ ज्या संतांच्या संसर्गानें गंगेला शुचिपण व पावनत्व येतें, त्या संतांचं शुचिपण किती श्रेष्ठ प्रतीचे असले पाहिजे बरें ? ७७ म्हणून, असा जो कोणी आपल्या शुचिपणाने तीर्थानाही आश्रय झाला आहे; ज्याने मनाचे मळ दिशापार उधळून लाविले आहेत; ७८ जो आंतबार सूर्यासारखा स्वच्छ व निर्मळ आहे; जसा पायाळू मनुष्याला भूमिगत द्रव्याचा ठेवा दिसतो, तसा जो तत्त्वार्थाचं रहस्य जाणतो; ७९ आकाश सर्व कांहीं व्यापितें, पण सर्वांपासून निर्लेप राहते, त्याप्रमाणेच ज्याचें मन नेहमीं सर्वत्र व्यापक पण उदास असतें; १८० जसा एकादा पक्षी पारध्याच्या हातांतून सुटावा, त्याप्रमाणें जो संसारतापांतून निसटून विरक्तींत दंग झाला आहे ८१ तसेंच नेहमीं आत्मसुखांत रंगल्यामुळे ज्याला कोणतीही टोंचणी जाचत नाहीं; मेलेल्याप्रमाणेंच १ आश्रय. २ टोंचणी, रुखरूख,