पान:सार्वजनिक मेळ्याची पद्यावली.pdf/५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ ( भगवान भुवनकल्याण ) पद ३ रें-चाल स्वातंत्र्य मिळविण्याला, बोध हा घ्यावा ॥ धृ ॥ स्वराज्यार्थ तुम्हीं, शिवरायाचा, डाव ओळखावा ॥ १॥ उठा बंधुनों, आळस सारा, झाडुनि टाकावा ॥ २॥ कार्यारंभी स्वयंस्फूर्ताचा, प्रसाद मागावा ॥ ३ ॥ जशास तैसे, योग्य वागणे, न्याय ध्यानीं ठेवा ॥ ४ ॥ स्वराज्यार्थ तुम्हीं, स्वार्थ पसारा, पाशचि तोडावा ॥ ५ ॥ एक विचारे, स्वराज्य पाया, भक्कम बांधावा ॥ ६॥ मायभूमिचे ऋण दिल्या विण देह न ठेवावा ॥ ७ ॥ 'सांप्रत काली रहस्य गीता धडा पुढे ठेवा ॥ ८ ॥ श्री टिळकांचा स्वराज्य गाडा पुढे चालवावा ॥ ९ ॥ 2 -- पद ४ थे - ( चाल – जादुगार ) तुमचे ढंग कधी सरणार हो, सावध कर्षि होणार ॥ धृ० पाश्चात्यांच्या, अनुकरणाची, चटक लागली तुम्हांला अधोगतीच्या, पायावरचा, वाडा किती टिकणार ॥ १ ॥ नसे टिकाऊ, आज कालची, दिखाऊ सारी सुधारणा ठरे अनुभवें, तरि तीच्या कां, मोहा बळी पडणार ॥ २ ॥ विलायतेमधिं काय चालले, डोळे उघडुनी नीट पहा नीति देवता, विषय सुखास्तव, केली तयानी ठार ॥ ३ ॥ मर्यादेचा दात्र उडाला, रान मोकळे हो झाले हित परिणामी, स्थिति नसे ही रसातळा जाणार ॥ ४ ॥