४ स्वसुख लालसे, पायीं त्यांना, आठवण नाहीं शीलाची कुणी कुणाचा, मान ठेविना, चोहोंकडे अंधार ॥ ५ ॥ भीक नको पण आवर कुत्रा, पाश्चात्यांची होय स्थिती सुधारणेनें, त्यांना केले, संसारी बेजार ॥ ६ ॥ आज तयानां, कळू लागले, आर्य संकृती उच्य किती परंतु तुम्हीं, मुर्ख करितसा, आज तिचा धिःकार ॥ ७ ॥ तत्व खरें हें पिकते जेंथें नाहीं विकले जात तिथें म्हणुनि तयांना, तुमची संकृती, आज होतसें प्यार ॥ ८ ॥ मर्यादेच्या बाहेर गेले तुमचे वर्तन या समयीं नडेल कैसे, हेचि कळेना, म्हणुनी वागता स्वैर ॥ ९ ॥ अधिसुवास वर्तत आपुले समाज बंधन पाळावे कोण तुम्हां मग ठेविल नावें छाती नाहीं होणार ॥ १० ॥ उघड उघड जे गैर दिसते टिका करितो सहज कुणी परंतु वर्तन सुधारवेना उलट शिव्या भडिभार ॥ ११ ॥ सभा भरवितां निषेध करिता तेल ओतितां आगत त्या योगें हा समाजरुपी किल्ला ढासळणार. ॥ १२ ॥ पद ५ वें. - ( चाल- - -शुभ वेळ मंगला आज. ) - अविनाश पुढे दिसतां, अजुनि उमजाना ॥ धृ० ॥ आर्य संस्कृति, लाथाडून तुम्हीं, स्वैर वागताना ॥ १ ॥ नटुनि सजुनी, मोहक बनणें, लज्जास्पद जाणा ॥ २ ॥ थाट नाटको, योग्य शोभतो, वारयोषितांना अधोगतीची, कमान चढती, डोळे उघडाना ॥ ४ ॥ ३ ॥
पान:सार्वजनिक मेळ्याची पद्यावली.pdf/६
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही