पान:सार्वजनिक मेळ्याची पद्यावली.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

7 सांता द्रौपदी, अनुसूयादिक, कुठे साध्वी ललना ॥ ५॥ अहिल्या तारा, सावित्रीची, गोड कथा श्रवणा ॥ ६ ॥ साध्वी स्त्रियांच्या पावित्र्याच्या, करा सुधापाना ॥ ७ ॥ धार्मिक बंधन, शिथील पडतां, ढंग सुचती नाना ॥ ८ ॥ मायभूमिच्या, भावि पिढीच्या, तुम्हीच माताना ॥ ९ ॥ जबाबदारी, ओळखून द्या, शिक्षण बालाना ॥ १० ॥ जागृति ठेवा, मातृपदाची. तुम्हीं वागताना ॥ ११ ॥ पद ६ वें-चाल --( असा मोहरा झाला नाहीं ) बलवंताच्या राष्ट्रीय पक्षा उठाउठा आतां काकुळतिनें हाक मारितो भारत भूमाता ॥ धृ ॥ निराशतेचा फत्तर फोडून मार्ग सुधारावा ध्येय गांठण्या श्रीटिळकांचा बोध मनीं ठसवा ॥ १ ॥ परावलंबन हुताशनीवर घ्या ठोकुनी बोंब चैत्र पालवी स्वराज्यं तरुला फुटती नव कोंब ॥ २ ॥ आजुबाजुचे निवडुंगाचें खच्ची करा रान त्या जागेवर एकजुटीची बाग करा छान ॥ ३ ॥ बागे मोजी लोकशाहिची आग्रतरु लावा स्वराज्य फळाचा रसस्वाद मग मधूर चाखावा ॥ ४ ॥ पद ७ वॅ– ( चाल – घ्या प्रभो झणी अवतार) ही भारत भू माता | विनविते हरि पदकमला || धृ०॥ कलिं युगी मातले दैत्य | तें असत्य ठरते सत्य सोसवना आतां भार || कशी नये दया हॅरि तुजला ॥ १ ॥