आजवरी ऐकिल्या गोष्टी ॥ धावलासी भक्ता साठीं मग:आज केली कां खोटी | कुणी वाली नुरे धर्माला ॥ २ ॥ घडतसें धेनु संव्हार || साधू संत छळ अनिवार घेईना कुणी : कैवार || हरि झोंप कशी ये तुजला ॥ ३ ॥ सोडुनी देती चोराशी || लटकती फाशि संन्यासी होतसे धनी चपराशी || धत्तुरा मिळे रावाला ॥ ४ ॥ सुग्रास मिळे दैत्यांना ॥ कोंडा न मिळे साधूंना अंबारी मिळे चोरांना || कुणि विचारि ना नीतीला ॥ ५ ॥ वेश्यांच्या सदनी बत्ती ॥ सति घरीं जळेना पणती अवनती घरीं गज झुलती हरि उठा न घ्या निद्रेला ॥ ६ ॥ धर्माची घडी बसवाया || साधूंचे रक्षण व्हाया ध्या करी सुदर्शन चक्र || घालवा दैन्य गोपाला ! ॥ ७ ॥ पद ८ वें- ( चाल:-बडव बडव रणढोल. ) नका हो पेटु हट्टास || बंधु हो ॥ नका हो पेटु हट्टास ॥ वादांत शेवटीं नाश ॥ बंधु हो ॥ धृ० ॥ कुणी मवाळ म्हणवी जहाल ॥ कुणी म्हणती श्रेष्ठ कौन्सिल ना कुणास कोणा मेळ || बंधु हो ॥ १ ॥ नाफेर फेरवाल्यांची लागली झुंज जोराची ॥ शेवटीं आहुति दोघांची ॥ बंधु हो ॥ २ ॥ बोलणं सोडुनी द्यावें | करणेची करोनी जावें आपुलें ध्येय गाठावें || बंधु हो ॥ ३ ॥
पान:सार्वजनिक मेळ्याची पद्यावली.pdf/८
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही