पान:सार्वजनिक मेळ्याची पद्यावली.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ मीपणा बाळ कडू प्यावें अभिमान बीज राखावें ! आपुल्या हिता जागावें ॥ बंधु हो ॥ ४ ॥ पद ९वे.- (चालः–रण : शिंग फुंकिले. ) सांप्रतकाळीं फिरे भारती, काल चक्र :उलटें ॥ धृ० ॥ वनराज केसरी, दैवगतीनें, उकीरडा फुंकी उमराव थोर, परि आज झेलति, रंकाची थुंकी ॥ १ ॥ आज ब्राह्मणा वाणिज वृत्ती कराविशी वाटे

क्षत्रिय मराठे, आज तयांना ब्राह्मण व्हावें वाटे ॥ २ ॥ शेतकऱ्यांनी शेती टाकूनि मजुरी पत्करिली कारागिर जन दलालिची त्या दुर्बुद्धी सुचली ॥ ३ ॥ निसर्ग निर्मित, स्वत्रंतेला लाथाडून दिधले प्रत्येक बाबतींत, स्वत्व गमवुनि परावलंबी बनले ॥ ४॥ दळण कांडणा पासुन आमुचें जीवित परस्वाधीन काडी इकडली तिकड़े न करवे दुसऱ्यांचे आधिन ॥ ५ ॥ युवती जनाच्या पेहरावाची आवड पुरुषांना आट पुरषी मर्द बनावें आवड ललनांना ॥ ६ ॥ ताकद नाहीं स्वैणपणाहा रोम राधं भरला म्हणुनि नाटकें खेळ सिनेमा सुचति या काला ॥ ७ ॥ एका गाली थपड बसता गाल दुजा पुढती त्राण नसे प्रतिकार कराया म्हणुनी सर्व वेदांती ॥ ८ ॥