पान:सार्वभौम राजाधिराज सातवे एडवर्ड बादशाह.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जागेवर हे ठिकाण तेजखी आणि रम्य दिसत होतें. उघड्या देवळाच्या गाभान्यांत मोडक्या कमानीखालीं एका टेबलावर फराळाचे सामान मांडिलें. महाराज आपल्या वनभोजनाचा उपभोग घेऊं लागले, आणि बराच वेळ बसून संवाद करित होते. त्या वेळेस त्यांच्या उन्हानें, तप्त झालेल्या सुखरूपाकडे, आणि मजबूत शरिराच्या आकृतीकडे पाहून, ते नुकतेच एकाद्या मोठ्या दुखण्यांतून उठले असावेत, असे वाटत नसे. त्यांची ती परिपूर्ण मधुर वाणी आणि मनःपूर्वक हांसणे यावरून त्यांचे आंगीं कांहीं अशक्तता राहिली असावी असें भासत नसे. म्यॉक्स बेटांतील लोकांना तें सर्व फार आश्चर्य आणि आल्हादकारक वाटलें. आणि दुसरे दिवशीं सकाळीं ते झोपेतून उठल्याप्रमाणें डोळे चोळूं लागले. आणि अशा गोष्टी खरोखरच घडल्या की काय याजबद्दल विस्मय करूं लागले ! महाराजांची निरीक्षणशक्ति. महाराजांची निरीक्षणशक्ति उत्तम कांदबरीकार बॉलझॉक यांच्यासारखी श्रेष्ठ अशी होती. मि० हॉलकेनसाहेब म्हण- तात कीं, पील या नांवाच्या किल्याकडे आम्ही गाडींत बसून जात असतांना ते म्हणाले की "या बेटांत नेमनिष्ठ लोक बरेच असावेत असे मला वाटतें." "होय महाराज, अशा प्रकारचे लोक खरोखरच आहेत." “परंतु आपले लक्षांत ही गोष्ट कशी आली हे मला सांगितल्यास त्यापासून मला समाधान वाटेल." २४