पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/140

हे पान प्रमाणित केलेले आहे.

निरीक्षणे वाचत असताना डॉ. राहुल सांकृत्यायनांच्या वैश्विक व्यासंगाने थक्क व्हायला होते.

 या भागात जावा, सुमात्रा, बाली, बोर्नियो, फिलीपीन, सेलीबीज इत्यादी द्वीपसमूहात बौद्ध धर्म कसा पोहोचला, त्यामुळे त्या द्वीपकल्पांत कोणकोणते बदल घडून आले याची लेखक जी माहिती देतो त्यातून या द्वीप संस्कृतीचे भारतीय संबंध रेखांकित होतात. विविध राजघराणी, त्यांचे वंशज, विविध युद्धे यांची तपशीलवार वर्णने वाचनीय आहेत. कला, शिल्प, निसर्गाचे बारकावे आश्चर्यचकित करून सोडतात. जावामध्ये संस्कृतचे प्राबल्य होते. त्या द्वीपावरील अकराव्या शतकातील साहित्य नि साहित्यकारांची सूची लेखन कलासह देत डॉ. सांकृत्यायन आपल्या माहितीची सत्यता पटवून देतात. या संदर्भात पृ. १५0 वरील सूची पाहण्यासारखी आहे. शंभर वर्षांपूर्वी बाली द्वीप कसं होतं हे वाचत वाचक शतकामागे जातो. बाली म्हणजे लघुभारतच हे निरीक्षण ज्यांनी बाली बेटास भेट दिली असेल त्यांना पटल्याशिवाय राहणार नाही. तीच गोष्ट बोर्निओ बेटाची. ‘नए अनुसंधानों से यह भी पता लगा है कि बाली ने जावा द्वारा नहीं बल्कि भारत से सीधे धर्म एवं संस्कृति को प्राप्त किया था।' (पृ. १७७)

हिंद चीन

 ग्रंथाच्या तिस-या भागात हिंद, चीनमधील देशांतील बौद्ध धर्म प्रसाराचे वर्णन आहे. यात व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड देशांचा अंतर्भाव आहे. व्हिएतनामचा दोन हजार वर्षांचा इतिहास म्हणजे भारतीय संस्कृतीच्या उदय आणि अस्ताचीच कथा. इथे अगणित शिलालेख आढळतात. ते सारे संस्कृत भाषेत आहेत. यातूनही हे संबंध सिद्ध होतात. इथे दानाची मोठी प्रथा आहे. अशा दान परंपरेतून इथे अनेक बौद्ध विहार, स्तूप उभारले गेले. असे अनेक शिलालेख ग्रंथात मूळ रूपात वाचावयास मिळतात. फोनन बेटावरील धर्म वर्णनातून लक्षात येते की हिंदू धर्माजागी बौद्ध धर्म आला तरी मूळ संस्कृती अभिन्नच राहिली. ग्रंथात पुढे जपानमधील बौद्ध धर्म प्रसार वर्णनात याचंच प्रतिबिंब पाहावयास मिळते. जपानमध्ये बौद्ध धर्म प्रसारापूर्वी शिंतो धर्म होता. बौद्ध धर्मप्रसारामुळे तो मागे पडला. पण बुद्धाच्या मूर्तीपुढे शिंतो देवतांच्या मूर्ती आढळतात. जपानमध्ये भारत इतिहास, संस्कृती व नागरिकांबद्दलचा आदर मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. सन १९९६ मध्ये जपानला असताना तेथील नारा प्रांतातील जगातील सर्वांत मोठी काष्ठ प्रतिमा पाहण्यास गेलो होतो. तेथील जपानी भंते मी भारतीय आहे म्हटल्यावर

साहित्य आणि संस्कृती/१३९