पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विचार करू शकणार नाही.एवढी वैचारिक स्पष्टता नसल्याने आणि मने आत्मविस्मृतीच्या रोगाने ग्रासलेली असल्याने धर्मालाच सार्वजनिक व्यवहारातून वळ करण्यात आले आहे.सदाचरणाचे.सन्मार्गाचे संस्कार नष्ट करून आपण पोकळी निर्माण करत आहोत आणि केवळ वासनांना मोकळे रान सोडत आहोत. बुद्धीवरचा मनाचा अंकुश काढून टाकला जात आहे परिणामी येनकेनप्रकारेण उपभोग, चंगळ,वासना, लालसा यांची अधिकाधिक सोय यामागे लागून आधुनिक मानव मनाची शांती गमावून बसला आहे. वाढती व्यसनाधीनता, हिंसाचार, गुन्हेगारी या साऱ्यांना अंकुश लावण्याचा प्रयत्न सरकार या कमकुवत बोटासारख्या संस्थेमार्फत व्हावा अशी आशा त्याला आहे.
 १०.०६ स्वामी विवेकानंदांनी हा पेच सुरेख शब्दांत मांडला आहे.ते म्हणतात, प्रत्येकासमोर दोन पर्याय असतात. आहे ती स्थिती सत्य धरून तिचे उदात्तीकरण करणे किंवा उदात्त स्थिती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करणे.(आयडियलाईज द रिअॅलिटी और रिअलाइज द आयडिअल).निर्णय माणसाने आपला आपण घ्यायचा आहे.आहे तेच उत्तम आहे म्हटले की काही करण्याची जरुरी नाही.कमी त्रासाचा हा मार्ग धरून उलट्यासुलट्या बौद्धिक व शाब्दिक कोलांट्या मारायला माणूस मोकळा होतो.
 १०.०७ भारतातल्या इंग्रजीतून विचार करणाऱ्यांनी, भारतीय मातीशी इमान राखणारे हे नाळेचे नाते नाकारलेले आहे.त्याच लोकांना समाजात बुद्धिमंत मानले जाते.समाजात त्यांचा वरचष्मा आहे.त्यांना मूळ मूल्यांचा शोध हा खुळा शोध वाटतो,ते प्रतिगामीपणाचे लक्षण वाटते.

 १०.०८ पहिला प्रश्न असा आहे, की ही मानसिक उडी मारायची आजच्या लोकांची तयारी आहे का? कारण ही उडी मारल्यावर मग आपल्या लक्षात येईल,की त्यांच्याजवळ तयार मसाला,तयार कल्पना फार थोड्या आहेत.व्यवस्थापक म्हणून प्रत्येकाला आपली प्रत्येक कृती मूळ मूल्यांच्या संदर्भात तपासावी लागेल.अनेक धक्के बसतील,बऱ्याच शिष्टमान्य कल्पना सोडाव्या लागतील-बदलाव्या लागतील, पुष्कळ नव्या वाटा सापडतील,त्यात पुष्कळ चुकाही होतील.प्रयोग करावे लागतील.या देशातल्या लोकांच्या लोकमानसाशी सुसंगत अशा आचारविचाराच्या पद्धती,प्रश्नांची त्यांची उकल आपल्यासमोर उभी राहील.बऱ्याच जुन्या रीतिरिवाजांचे नवनवे संदर्भ,नवे अर्थ सापडतील.अशीही शक्यता आहे की लोक काम का करतात,किंवा त्यांनी का करावे- कसे करावे याचे प्रेरणास्त्रोत सापडतील.हे काम सोपे नाही.त्यासाठी अमेरिकन मॅनेजमेंट किंवा जपानी मॅनेजमेंट असा रेडिमेड तयार मसाला किंवा झटपट

सुरवंटाचे फुलपाखरू ५१