• आरोग्यं भास्करादिच्छेत् । स्मृतिरत्नाकर, मत्स्यपुराण ६७/७१ आपले आरोग्य सूर्यनारायणाच्या कृपाप्रसादावर अवलंबून आहे. भुवनज्ञानं सूर्ये संयमात्। भगवान पतंजली सूर्यनारायणाचे ध्यान केल्याने संपूर्ण चराचर सृष्टीचे ज्ञान होते. • सूर्यआत्माजगतस्तस्थुषश्च -- ऋग्वेद, यजुर्वेद . सूर्यनारायण अखिल विश्वाचे भरण-पोषण-संवर्धन-संचालन करणारा आहे. निधिरेष दरिद्राणां रोगीणां परमौषधम् । सिद्धि:सकलकार्याणां गाथेयं संस्मता रवेः ।। श्रीयाज्ञवल्क्यविरचितं सूर्यस्तोत्र भगवान सूर्यनारायणाची ही आर्यास्तुती दरिद्री लोकांसाठी धनाचा खजिना आहे, रोग्यांसाठी सर्वोत्तम (परम) औषध आहे, सर्वांच्या सर्व मनोकामना सिद्ध करणारी साधना आहे. ● ● • -- -- पूजयस्वैनमेकाग्रो देवदेवं जगत्पतिम् ।। एतत् त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयिष्यसि ||२६|| अस्मिन् क्षणे महाबाहो रावणं त्वं जहिष्यसि - राम-रावण युद्ध सुरू असतांना भगवान अगस्ती ऋषि प्रभुरामचंद्रांना सांगतात, (हे राघवा! संकट काळात दुःख-भय- आपत्तीमध्ये सापडलेला जो कोणी भगवान सूर्यनारायणाचे कीर्तन करतो तो संकटमुक्त होतो.) हे महाबाहो ! युद्धात विजयी होण्यासाठी तू देवाधिदेव, जगदीश्वर सूर्यनारायणाची एकाग्र चित्ताने तीन वेळा पूजा कर. या क्षणी तुला रावणाचा वध करता येईल. सूर्योपासक समर्थरामदास स्वामींचे ब्राह्मतेज व छत्रपती श्रीशिवप्रभूंचे क्षात्रतेज एकत्र आल्याने प्रतापी व भाग्यशाली कालखंड महाराष्ट्रात अवतरला हे वाचक जाणतात. शतक १७ वे. श्रीमंत बाळासाहेब पंत बी. ए. प्रतिनिधी, संस्थान औंध यांनी अठरा वर्षे शास्त्रोक्त सूर्यनमस्कार घातले. स्वत: अनुभूती घेतली. संस्थानातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचा व्यायाम आवश्यक केला. दोन वर्षे विद्यार्थ्यांना आलेले अनुभव लक्षात घेतले. त्यानंतर 'सूर्यास नमस्कार' ही पुस्तिका प्रसिद्ध केली. सन १९२६. सूर्यनमस्कार एक साधना xii
पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१३
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही