पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोकळे ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. हळूहळू मान डावीकडे फिरविण्यास सुरुवात करा. मानेवर मिळणारा विरुद्ध दिशेचा ताण स्वीकारा. सावकाश पुढे सरका. श्वास सोडण्याकडे लक्ष द्या. मान वरती आणतांना श्वास घेण्याकडे लक्ष द्या. आवर्तन पूर्ण झाल्यावर मान आणखी मागे ढकलण्याचा प्रयत्न करा. मानेला मिळालेला ताण स्वीकारा. थांबा. मान न हलवता ताण हळूहळू मोकळा करा. शरीराच्या कोणत्या भागामधून ताण मोकळा होतो याकडे लक्ष द्या. पूर्ण | ताण मोकळा झाल्यावर मान सावकाश सरळ करा. पुढील क्रिया करण्यापूर्वी मान खाली वर बाजूला सावकाश फिरवा, मोकळी करा. ही संपूर्ण क्रिया मानेचे व्यायाम मान उजव्या बाजूने फिरवून पूर्ण करा. लक्षात घ्या मानेतून गेलेल्या नसा संपूर्ण शरीरात पसरलेल्या आहेत. अगदी डोक्यापासून पायापर्यंत. - 4 डोक्यात असणारा मेंदू शरीरातील सर्व स्नायूंपेशींच्या संवेदना स्वीकारतो व योग्य त्या शरीरिक / मानसिक क्रियांचे संचालन करतो. कल्पना करा कापडाच्या बाहुलीला काचेची गोटी डोके म्हणून दोऱ्याने बांधायची आहे, सुई-दोरा, चिकटपट्टी, डिंक याचा वापर करायचा नाही मात्र मानेसारखी हालचाल करता येईल या पध्दतीने ती सैल बांधायची आहे. 1 नुसत्या कल्पनेनेच मानेच्या स्नायूंचे कार्य त्यांना कार्यरत करण्याची आवश्यकता आणि व्यायाम करतांना घेण्याची काळजी सर्व काही लक्षात येते. 4 अस्तीपंजर उभविला। सीरानाडी गुंडाळिला। मेदमांसें सरसाविला। सांदोसांदी भरूनी ।। - श्रीमत् दासबोध - ३/१/१५ सूर्यनमस्कार एक साधना ११३