पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चुंबकीय आकर्षणातून लक्षात आले. यातून एक निष्कर्ष काढला की जेथे मन एकाग्र होते तेथे ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जाशक्ती मिळाल्यामुळे पुढील कृती अधिक चांगल्या प्रकारे करता येते. श्वास घेण्याकडे किंवा सोडण्याकडे लक्ष द्या याचाच अर्थ ही क्रिया मनापासून करा. क्रियेमध्ये मन एकाग्र करा. ज्या ठिकाणी मन एकाग्र होते तेथे ऊर्जा तयार होते. व्यावहारिक भाषेत सांगायचे झाल्यास ही क्रिया बलपूर्वक केली जाते. श्वासाची गती खोल व दीर्घ होते. नियंत्रित गतीने सूर्यनमस्कार घालतांना सूचना असते- श्वास सोडण्याकडे किंवा घेण्याकडे लक्ष द्या. एक शरीर स्थिती करतांना आपण अनेक वेळा श्वास घेणार- सोडणार आहोत. प्रत्येक वेळी श्वास सोडण्याकडे लक्ष दिल्यास वापरलेले प्राणतत्त्व अधिक प्रमाणात शरीरातून बाहेर पडते. याचा परिणाम म्हणजे थोड्या मात्रेमध्ये कां होईना आपली श्वास आत घेण्याची क्षमता वाढते. प्रत्येक श्वासागणिक ही क्रिया केल्यामुळे श्वसनसंस्था सुदृढ होते. श्वसनाचे संदर्भात आणखी एक सूचना असते. श्वास घेतांना (किंवा सोडतांना) ही क्रिया करा किवा संपूर्ण श्वास घेतल्या नंतर (किंवा सोडल्या नंतर) ही क्रिया करा. एका आसन स्थितीमध्ये आपण अनेक वेळा श्वास घेणार आहोत. त्या प्रत्येक वेळी श्वास घेण्याकडे लक्ष देऊन हे आसन अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तीन वेळा श्वास घेतल्यास ठराविक स्नायूंवर योग्य ताण-दाब देण्याचा अधिकाधिक चांगला प्रयत्न तीन वेळा करायचा आहे. हा प्रयत्न हळूवारपणेच करायचा आहे. स्नायूंना जोर-जबरदस्ती, धक्का झटका देऊन हा प्रयत्न करायचा नाही. सूर्यनमस्कार साधनेतील दररोजचा उद्देश साध्य होण्यासाठी स्नायूंच्या कलाने प्रयत्न करायचा आहे. त्यांचा कान धरून सक्तीने त्यांच्याकडून काम करून घ्यायचे नाही. प्रश्न- अ) सूर्यनमस्कार साधनेतून सर्व रोग व्याधी व्यसन दूर होतात. अकाल मृत्यूचे भय नष्ट होते. मग असे जर आहे तर सूर्यनमस्कार साधना सुरू असतांना औषधे घेण्याचे प्रयोजन काय ? ब) सूर्यनमस्कार साधना नित्यनेमाने सुरू आहे तरीही हृदयविकाराचा त्रास होतो. असे कां होते ? सूर्यनमस्कार एक साधना २३१