पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समाजाला प्रयत्नवादाचा धडा दिला. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. ● 'श्री ग्रंथराज दासबोध' या ग्रंथाच्या प्रस्तावनेत श्रीधरस्वामी महाराज (१९०८ ते १९७३) यांनी उल्लेख केलेला आहे की समर्थ रामदास स्वामी स्वतः बाराशे सूर्यनमस्कार घालीत व शिष्यांकडूनही घालून घेत असत. • समर्थ रामदास स्वामींचे जनकपिता सूर्याजीपंत नित्य एक हजार सूर्यनमस्कार मुख्य उद्देश आत्मतेज जागृत होणे. हे वाक्य श्रीहनुमानस्वामींची बखर यामधील आहे. घालीत. - ● --- मसूलकर आश्रम (कराड, सातारा) सूर्यनमस्काराचा प्रचार प्रसार करण्यामध्ये अग्रेसर होता. या आश्रमामध्ये अठरा महिला दररोज बाराशे सूर्यनमस्कार घालत असत. • धर्मभास्कर श्री. विनायक महाराज मसूलकर यांच्या भगिनी श्रीमती. द्वारकाबाई कुर्लेकर बाराशे सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक ठिकठिकाणी सादर करून सूर्यनमस्काराचा संदेश आम जनतेला देत असत. • १९२८ साली यशवंत व्यायाम शाळा, नासिक, यांनी सर्व शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनी तसेच गावातील प्रौढ महिला - पुरूष यांना यशवंतराव महाराज पटांगण, गंगाघाट, नासिक येथे एकत्र केले. एका महिन्यात एक लाख सूर्यनमस्कार यशवंतराव महाजांना घालण्याचा संकल्प केला. सकाळी ६.०० ते ८.०० या वेळेमध्ये गंगाघाटावर येऊन सूर्यनमस्कार घालणाऱ्यांची संख्या ७५० पेक्षा अधिक होती. दररोज संपूर्ण वेळ किमान ३५० लोक सूर्यनमस्कार घालत होते. त्या त्या शाळेत मुलांनी घातलेले सूर्यनमस्कार व गंगाघाटावर घातलेले सूर्यनमस्कार यांची एकूण संख्या 7 १०००,००० दहा लाख होती. सांगता सभारंभाचे अध्यक्ष श्री काका गद्रे यांनी विद्यार्थ्यांची चौकशी करून या 7 - संदर्भ - श्री कृष्णाजी बळवंत महाबळ (गुरुजी), संस्थापक अध्यक्ष यशवंत व्यायाम शाळा, नासिक व कन्या आरोग्य केंद्र, नासिक यांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेले आत्मवृत्त 'माझी स्मरणी' यातील एक निवेदन. ही नोंद त्यांचे नातू श्री. रघुनाथ प्रभाकर महाबळ यांनी उपलब्ध करून दिली. सूर्यनमस्कार एक साधना २७१