पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे. नित्यकर्म आहे. अधूनमधून केंव्हातरी करण्याचे प्रासंगिक कर्म नाही. ही साधना नित्यनेमाने दररोज करावयाची आहे. जो पर्यंत साधना सुरू आहे तोपर्यंत याचे प्रशिक्षणही सुरूच असते. साधनेमधे प्रत्येकाचे दररोज प्रशिक्षण सुरू असते म्हटल्यावर समग्र संहिता कशाला? वेदकालात सूर्योपासना या ना त्या स्वरूपात प्रत्येकानेच स्वीकारली होती. मग सार्थ संहिता कोणी लिहायची, कोणाला सांगायची? समर्थांना साधना श्रद्धेने करावी अशीच अपेक्षा आहे. साधनेचे शास्त्र करू नये हा त्यांचा आग्रह आहे. वैयक्तिक श्रद्धेतूनच साधना विकसित होते. साधनेतील प्रगतीमुळे श्रद्धा प्रगल्भ होते. प्रत्येकाची श्रद्धा व मनाची एक- आग्रता एकसारखी नसते. म्हणून साधना शास्त्रीय चौकटीत बांधल्यास साधकांचा गोंधळ होतो. साधना ही उपासना न राहता प्रचितीचे फक्त कारण होते. प्रत्यक्षात अनुभूती मात्र दूरच राहते. म्हणूनच समर्थभक्त वासुदेव गोसावी ऊर्फ सदाशिवशास्त्री येवलेकर यांनी रामनामावर शास्त्रीय दृष्टीकोनातून लिहिलेला आपला ग्रंथ आपल्या हाताने नष्ट केला. सूर्यनमस्काराची साधना करतांना मी ज्या गोष्टी प्रकर्षाने अनुभवल्या त्याची नोंद सूर्यनमस्कार कार्यपुस्तिका (साधकांसाठी) या भागात थोडक्यात दिलेली आहे. सूर्यनमस्कार घालण्याचा हा आदर्श कृतीपाठ नाही. आत्मारामाकडून प्रशिक्षण घेण्यासाठी किमान कौशल्य अपेक्षित आहे. साधनेमध्ये साक्षर होण्यासाठी हा एक पथदर्शक प्रयत्न आहे. यामध्ये काही कमतरता असल्यास ती चूक व्यक्तीशः माझी आहे. ही चुकीची फोफट शाब्दिक टरफले बाजूला ठेवा. शब्दांचा आशय व उद्देश लक्षात घ्या. त्यातील लक्षार्थाचे धनवट हा जीवनरस आहे. त्याचा आस्वाद घ्या. बलवंत व्हा. साधनेमधील अमृततत्त्वाने मी तृप्त आहे. हे अमृतत्त्व काय आहे? त्याची गोडी कशी आहे? कोणत्या प्रकारची आहे? या प्रश्नांची उत्तरे मला सांगता येणार नाहीत. मी मुका आहे. मूक भाषेत हातवारे, अभिनय, हावभाव करून आशय व्यक्त करता येतो. लिहितांना यांचा ही आधार सुटतो. आश्रय आहे फक्त सूर्यनमस्कार एक साधना २८१