पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यनमस्कार व्याख्या व धार्मिक अधिष्ठान तक्ता क्र. अठरा उरसा शिरसा दृष्ट्या वचसा मनसा तथा । पदाभ्यां कराभ्यांजानुभ्यां प्रणामोऽष्टांग उच्यते ।। (स्कंधपुराण, शिवपुराण, पद्मपुराण ) सूर्यनमस्काराला संस्कृत शब्द आहे साष्टांगनमस्कार. एकूण आठ शरीर अंगाचा वापर करून आदर व्यक्त करण्याची कृती म्हणजे सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार व्यायाम प्रकारामध्ये स्थूल शरीराचे आठ भाग वापरले जातात ते आहेत दोन हात, दोन पाय, दोन गुडघे, छाती व कपाळ. सूर्यनमस्कार साधनेमध्ये स्थूल व सूक्ष्म शरीराचे आठ भाग वापरले जातात ते आहेत छाती, कपाळ, दृष्टी, वाचा, मन, पाय, हात, गुडघे. यातील दृष्टी, वाचा, मन, हे सूक्ष्म शरीराचे भाग आहेत. या सर्व अवयवांचा वापर सूर्यनमस्कारामध्ये कसा होतो ते आपण प्रात्यक्षिकाचे वेळी अनुभवणार आहोत. सूर्यनमस्कार, संध्याविधी, गायत्री मंत्र, अग्नीहोत्र इत्यादी अनेक प्रकारच्या सूर्य उपासना आहेत. या प्रत्येक प्रकाराचा उद्देश ज्ञान, आनंद, आरोग्य प्राप्त करणे हा एकच आहे. ज्ञान होणे म्हणजे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे. ज्याबद्दल प्रत्यक्ष अनुभूती नाही ती फक्त माहिती या प्रकारात मोडते. या सर्व सूर्योपासना आहेत. पण प्रत्येक उपासनेचे काही खास असे वेगळेपण आहेच. गायत्री मंत्रामध्ये चोवीस अक्षरे आहेत. यातील प्रत्येक उच्चार शरीराचा एक एक अवयव प्रभावित करणारा आहे. त्याचप्रमाणे सूर्यनमस्कारामध्ये हळू हळू हे चोवीस अवयव विकसित केले जातात. पद्धती किंवा मार्ग यामध्ये अनेक बदल असले तरी अंतिम उद्दिष्ट मात्र एकच. ते आहे सूर्योपासनेतून आपले आणि आपल्या परिवाराचे आरोग्य- आनंद वर्धिष्णू ठेवणे. चोवीस न्यास केंद्र : पायाचे अंगठे, घोटे, पोटऱ्या, गुडघे, मांड्या, गुद, लिंग, कंबर, बेंबी, पोट, छाती, हृदय, कंठ, मुख, टाळू, नासिकाग्र, डोळे, भ्रूमध्य, कपाळ, पूर्वमुख, सूर्यनमस्कार एक साधना २०