(८) पद १० वें.. चाल: –' किती मजेदार हार प्र सुखद-समय परि दुःखद वाटे टिळक हानिनें गजानना || धृ० ॥ मिळवुनि आर्या हिंदवासिया हक्क तयांचे जाणविले । सौख्य संपदा सर्वही लोकां देण्यासाठी जे झटले ॥ १ ॥ विसरुनि जाती भेद कराया सत्कार्थी नच तो भ्याला । घेउनि हाती स्वराज्य लक्षां दावि दिव्य सन्मार्गाला ॥ २ ॥ हिंद बंधुनो ना विसरावें गजाननाच्या मूर्तीला । सुख - कर भय - हर विघ्न विनाशक आत्म धर्मि आहे पहिला ३ धर्मग्लानी जर्धी होतसे पाप अनय माजे अवनीं । धर्म-रक्षण-ब्रीद तयांचें येत असे प्रभु धावूनी ॥ ४ ॥ पद ११ वें. चाल – कच चूर्ण चाखितां मजा आला. गांधीजना भजूं पूजुया । हत्कमलांनी चरण नमूं या || भ्र० ॥ असेल झाला होइल बोला । धन्य महात्मा हाच जगीं या ॥ १ ॥ शशि शांतीचा रवि धैर्याचा | रामव्रताचा बंदूं तया ॥ २ ॥ स्वार्थत्यागी स्वावलंबनी । मोहित होई रिपूही जया ॥ ३ ॥ स्वत्व बाणवी मीपण हरवी । जागी केली खुळी दुनिया ॥ ४ ॥ ऋण झुण मधुरा छुमछुम सारा। दुमदुमला यशनाद जगी या ५ अस्थिपंजरी आत्मा उरला | बंदिवास देशार्थ करुनिया ॥ ६ ॥ जगन्मोहना जमज्जीवना । तोडि बंधना सोडी तथा ॥ ७ ॥
पान:सोट्याह्मसोबा मेळ्याची पदें शके १८४५.pdf/१०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही