पान:सोट्याह्मसोबा मेळ्याची पदें शके १८४५.pdf/३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गणपतीच्या मेळ्याची पद्ये, चाल–' परमार्थाचा हा पंथ चीकट. ' मधु मंगल धामा । सौख्य विश्रामा । पुरुषोत्तमा ॥ धृ० ॥ चरणि शरण करुणागारा | गणनाथ भव–भयहारा । सदया, सुखदा, शुभकारा । सत्पथ दावा । सत्कृति करवा दिव्यशी । मति द्या अशी । सरशी तशी ॥ १ ॥ दुर्गम संकट काल उदेला । अंधार जगत भरला हतबल, जितखल, जन झाला तुजविण वाली । या काली । ना कुणी । ये बा झणीं । प्रभु धावुनी ॥ २ ॥ पद २ रें. चाल – " मशि बोलु नको गोविंदा " तूं रिपु-भय-हरिणि भवानी । कां निजली पावनी ॥ बहु शिणलों अळचुनी । कीं थकलों विनवुनी ॥ धृ ॥ कां पात्र नसूं वर द्याया । तव कृपाच संपादाया हा छल करवीसी म्हणोनि । कां देवी गुणखनी ॥ तूं० ॥ तूं माय आमची नागे । खल करवी छल मग कां गे तलवार स्वतां उचलोनी । करि शकले याहुनी ॥ तू० ॥ अपराध भयंकर झाले । घे पोटी सकल दयाळे