पान:सोट्याह्मसोबा मेळ्याची पदें शके १८४५.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४) सेनानायक तुम्हा पाहुनी वीर मावळे जमले ! स्त्रिया तरुण आबाल वृद्धही उत्साह सरसरले ॥ २ ॥ सत्याग्रह सत् युद्ध ( सयुद्ध ) युक्त हैं सुपिक देश राखाया । पुकार केली कुंड पेटलें भरवीले चैतन्या ॥ ३ ॥ जिल्हापरिषद बारामतिला विषय निघाला पुढती । पगडीच्या झिरमिळ्या फिरविल्या गभीर मंडुक वृत्ति ॥४ रण संग्रामा तोंड लागता सेनानाथ पळावा | रिपू चिरितसे त्या सेनेला असा समय कां यावा ॥ ५ ॥ पाठ दाविता तुम्ही शत्रु तो थयथय नाचत आला । स्त्रिया पुरुष सर्रास घेरिले तुरुंग दावायाला ॥ ६ ॥ खाइ पेटली पडति पटापट एकामागे एक । कच्ची बच्ची थोर विभूती बुद्धिविशारद लोक ॥ ७ ॥ सक्त मजूरी दगड फोडितां चळवळ रक्त वहातें ! घाण्याखाली मान मोडली कसें तुम्हा बघवे तें ॥ ८ ॥ शरीर उघडे फटके घेतें चमडे लोंबत राही । रक्त मांस बाहेर निघावें शिव शिव निघृणता ही ॥९॥ या परता घ्या स्वतां निजकरीं घोर नग्न तलवार । चिरा चराचर देशबांधवां लावा जगतापार ॥ १० ॥ अपमानाचें शल्य बोंचतें सूड घेतसा पुरता । की कैदेचें चित्र भयानक थरथरवीतें चित्ता ।। ११ ।। स्वयें कथियलें कौन्सिलावरी बहिष्कार घालावा । उलट घेउनी कां पलटविता धरसोडीचा कावा ।। १२ ।। स्वतां न जातां कौन्सिलांतरी उपदेशिन जनतेला । कृष्ण प्रतिज्ञा भंगे कां कुणि भीष्म येत युद्धाला ॥ १३ ॥ दिवाण होउनि पीळ मिशाचा भिडवा डोळ्याखाली । जन्माचें सार्थक्य होऊं द्या स्वार्गे घाट घणघणली ॥१४॥