पद ६ वें. चाल- सुखदा सुभास झाला दुनिया झुकेल झोला । चाहिये झुकानेवाला ॥ ध्रु० ॥ आठवा शिवाजि बाजी तान्हा हिरा हिरोजी । केला रणांत दुल्ला जितला स्वराज्य किल्ला ॥ १ ॥ वीरा भाउरावा राघो भरारि आठवा | चिरिला गळा रिपूचा झाला अजिंक्य साचा ॥ २ ॥ 66 - "" पद ७ वें. चाल - " हमारा देशप्यारा है हमारा रामप्यारा है ". मुळाशला चला एकदां की, मेळवा मोक्ष याच लोकीं ||धू० || धन्य तो युद्ध समाप्तीचा | पात 11 काल सुभाग्याचा । उठावें वृद्ध तरुण भगिनी । जयाचें हिंद अदि त्यांनी ॥ १ ॥ वहाते दिव्य पुण्यगंगा। तों-वरी स्नान करा भागा । लुप्त ती राम-जन्म दिवशीं । असे होणार निश्चयेसी ॥ २ ॥ कोन्सिले सौख्य वैभवाची । नको ती राष्ट्रघातक्यांची | लालसा गर्व - माद जेथें । कशाचें देश-कार्य तेथें ॥ ३ ॥ मजेचा महाल रंगेला मिळू द्या तथा राहण्याला | आपला हॉल कैदखाना। मोक्षदा रम्य भव्य माना ॥ ४ ॥ तयांना उशा मऊ गिरद्या । बसाया कोच उंच गाद्या । फाटक्या काम्याची रकटीं । आपलें देह रक्त चाटी ॥ ५ ॥ तेथचा थाट मनोहारी । नको ते भाग्य हास्यकारी | आपले ध्येय अन्य छंदीं। वागणें नित्य भाष्य बंदी ॥ ६ ॥ पगाडेचा झोक नोक त्यांना झिरमिळ्या इलत डोलतांना आपल्या कानेळे डोई । दाविते विभव सांप्रदायी ॥ ७ ॥ लाविला गंध होल्डराला । टाक तो तयां लेखनाला । 'हातोडी खडी फोडिताही। रक्त ये, सी आपणा शाई ॥ ८ ॥
पान:सोट्याह्मसोबा मेळ्याची पदें शके १८४५.pdf/७
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही