पान:स्त्रियांचीं कर्तव्यें.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पण लवकरच अशा मेळ्यांपासून तिला करमणूक वाटेनाशी झाली. वी १९ वर्षांची झाली तेव्हांपासून शेजारच्या शेजारीं कधींकाळी जेवणास जावें व घरीं राहून आल्यागेल्याचें आदरा- तिथ्य करावें, तसेंच वर्ष दोन वर्षांनीं लंदनास व आयर्लंदास जाऊन सृष्टिसौंदर्य व देखावे पहावे, यापलीकडे मेळ्यांस वगैरे जाण्याविषयीं आपणास आग्रह करूं नये अशी तिनें आपल्या वडिलांची विनंति केली. आणि अशा प्रकारें एकांतवासांत राहून आपला अभ्यासक्रम झपाट्यानें पुढे चालविला. या शि- वाय शाळा सोडल्यापासून (१८३८-५७ पर्यंत ) घरची सर्व व्यवस्था तिच्या आईबापांनी तिच्यावर सोंपविली होती व तीही ती मोठ्या आनंदानें करीत होती. (C ती एकदां एका नामांकित वाईच्या घरी गेली असतां त्या बाईच्या तरुण मुलींस तिनें मोठ्या उत्सुकतेनें सांगितलें कीं, 'अभ्यासापासून फार सुख आहे, तुझी ग्रीक भाषेचा व गणिताचा अभ्यास करा." हे तिचें भाषण त्यांच्या आईनें ऐकलें, तेव्हां ती मिस कॉब इजला हाणाली, "मुली, हे तुझे विचार मला पसंत नाहींत, स्त्रियांनी गृहकृत्यांकडे पहावें आणि आपल्या नवयांस व मुलांस सांभाळावें, हेच त्यांचें कर्तव्य असे मला वाटतें. तर तूं आपला अभ्यास आपल्यापाशींच ठेव, आमच्या मुलींना तो करण्याविषयीं उपदेश करूं नको." नंतर त्या बाईनें मिस कॉवला आपल्या घरांतील सामानसुमान दाखविलें; पण तें इतकें अव्यवस्थित आणि घाणेरड्या स्थितींत होतें कीं, कित्येक सुंदर चिनई भांड्यांवर तर एक वर्षाचें उष्टें चिकटलेलें होतें ! तें पाहून ती बाई आपल्या चाकरांवर घुसपुस करूं लागली. तेव्हां मिस् कॉब तिला ह्मणाली, "हें सामान फारच सुरेख आहे. आमच्या घरीं असलें कांहींच नाहीं. थोडींशीं हिंदुस्थानी भांडीं आहेत;