पान:स्त्रियांचीं कर्तव्यें.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० व मतांच्या स्त्रीपुरुषांनीं साह्य केले. त्यांत कार्डिनल म्यानिंग, लॉर्ड टेनिसन, चीफजस्टिस कोलरिज, राबर्टब्रोनिंग, डाक्टर मार्टिनो व त्याचप्रमाणें टामस कार्लेल व विद्वान् व नामांकित पुरुष प्रमुख होत. लार्ड टेनिसन यांनीं तर मरणापूर्वी कांहीं दिवस मिस् कॉब बाईची भेट घेऊन जिवंत प्राण्यांस क्रूरतेनें वागविण्यांत येत आहे त्याचा प्रतिबंध होईपर्यंत अशीच लढाई करीत राहा, असें तिला सांगितलें. ह्या बाईनें धर्मपर व नीतिपर बरेच ग्रंथ लिहिले आहेत. त्या शिवाय "एको” नांवाच्या वर्तमान पत्राला ती सात वर्षेपर्यंत मजकूर लिहित असे. वर्तमानपत्रांस लिहिणें हा एक आल्हाद - कारक आणि उपयोगी धंदा तिला वाटत असे, कारण त्यांत नि- रनिराळ्या गुणांचा उपयोग करण्यास अवकाश मिळतो, त्यामुळे तिनें एखाद्या कचेरींत कारकून वगैरे तेंच तेंच कंटाळवाणें काम करितांना पाहिले ह्मणजे त्यांची तिला कींव येत असे. या सात- वर्षीत तिनें एक हजारांवर आर्टिकलें (निबंध) व असंख्य स्फुट लेख लिहिले. पण त्यांत एकही आपल्या मतास सोडून लिहि- लेला नाहीं, ही गोष्ट तिला भूषणास्पद होय; कारण, पत्राचा मा- लक भिन्न मताचा होता; व साधारण नीतीच्या मनुष्यानें त्याला खुष ठेवण्याकरितां आपली मतें एकीकडे ठेविलीं असतीं. तिचा आजा माजिस्ट्रेट होता, त्याच्या खुर्चीवर खालील वचन लिहिलेलें होतें: “ज्याला शत्रूनीं गांजलें असेल त्याचा तूं बचाव कर.” मिस् कॉब त्याप्रमाणें करीत आली आहे हे तिच्या चरित्रावरून उघड दिसतें; मग तो गांजलेला प्राणी पुरुष असो किंवा स्त्री असो किंवा एखादें जनावर असो. आपल्या देशांत राजा राममोहनराय ह्मणून जो बंगाल प्रांतांत सुमारें ६० वर्षांपूर्वी महापुरुष होऊन गेला त्याच्या च-