पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हु र डा ख द ख द ला

 “गोपाळराव तुम्ही खरंच रागावलांत की हो! अहो ही सारी गंमत होती. तुमच्या कसें ध्यानात आले नाही."
 पण गोपाचा ज्वालामुखी आतां संपूर्ण जागा झाला होता. त्याची बडबड बंद होईना. डॉक्टरांनी त्याला एक रुपया दिला. तरी तो शांत होईना.
मी तुमच्यासाठी हुरडा आणला होता. तो तुम्हाला गरमगरम भाजून देणार होतो.
 " अरे गोपा तुला पाहतांच आम्ही तुझा हुरडा मुळी शिजायलाच टाकला. तो इतका वेळ खदखदत होता. त्यापुढे तुझ्या भाजलेल्या हुर- ड्याची काय कथा?"
 आम्ही सर्व हसलों. गोपाहि हसूं लागला. शेवटी टिळक बाहेर आले.

त्यांना हा सगळा प्रकार समजल्यावर ते आम्हांला खूप रागे भरले.